फ्रांसची सहल
चोवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अशा चार दिवसाच्या सहलीसाठी जवळ जवळ एक महिन्या पूर्वी च बुकिंग केला होतं. एका गुजराती भारतीयाच्या मालकीच्या स्टार टूर्स बरोबर जायचं ठरलं होतं. france ला जाण्यासाठी schengen visa लागतो.त्यासाठी online appointment घेतली होती.दहा तारखेला वीसा साठी लंडन ला गेलो. तीन तासांच्या अत्यंत सुनियोजित प्रक्रियेनंतर आणि ५० पौंड खर्च केल्यानंतर ६ महिन्याचा schengen visa मिळाला. हा वीसा european union च्या कोणत्याही देशात चालतो.
चोवीस तारखेला सकाळी दोनलाच उठलो. पाऊणे सहाला london मधल्या wembley या ठिकाणी पोहोचायचं होतं. बरोबर कंपनी तलेच ४ बॅचलर होते.लंडन ला जाण्यासाठी आम्ही कार भाड्यानी घेतली होती.पण सगळ्यांचाच मनात भीती होती लंडन च्या रस्त्यांची ! आमचा च एक हौशी मित्र ड्राइवर आम्हाला "पोचवणार" होता.अनेक प्रिंट आउट काढून,पन्नास वेळा नकाशा घोकून सुद्धा व्हायचं तेच झालं.लंडन जवळच १ तासभर भरकटलो.नशीब चांगलं म्हणून कसेबसे साडे पाच ला wembley ला पोहोचलो.तिथे बघतो तर आधीपासूनच ५० जाणं येऊन थांबली होती. चार गाड्या (luxury coaches) भरून ,जवळ जवळ दोनशे एक "अनिवासी आणि प्रवासित भारतीय" पॅरिस फिरायला निघाले होते. आमच्या गाडीत खूपसे फॅमिली मेंबर होते.आणि शेवटच्या रांगेत आम्ही पाच जाणं.बस अगदी वेळेत सुटली .तासभरातच सर्व फॅमिली मेंबर ची छोटि छोटि पोरं आमची दोस्त मंडळी बनली.बस च्या मागच्याच रांगेतून गोधळचा आवाज येत होता.ब्राह्म मुहूर्तावर उठलेले बाकीचे सगळे गाढ झोपले होते. 
थोड्याच वेळात आम्ही डोवर या ब्रिटीश बंदरात दाखल झालो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्र्यूज़ मध्ये शिरे पर्यंत काहीच चेक झालं नाही.पासपोर्ट,वीसा काहीच बघितलं नाही कुणी !जवळच्या एका आलिशान मॉल मधे युरो करेन्सी खरेदी केली . आणि आमच्या गाडिसकट सगळे क्र्यूज़ मधे शिरलो. दहा पंधरा वोल्वो सारख्या गाड्या आणि ५०० एक माणसं वाहून न्यायची केपॅसिटी होती ,त्या मोठ्या जहाजाची. डेक वर फोटो काढण्यात आणि duty free shopping mall फिरण्यात दीड तास कसा गेला कळलच नाही. एकाच्या सुमारास calais या फ्रेंच बंदरात दाखल झालो. या ठिकाणी सुद्धा काहीच चेकिंग झालं नाही. ( इंग्लेंड मधून आलेल्या लोकांवर जरा जास्तच भरोसा ठेवतात की काय ! ) पॅरिस २५० कि मी डोर होता अज़ून. इंग्लीश आणि फ्रेंच घडाळ्यात एक तासाचा फरक आहे.त्या मुळे फ्रांस मधे पोहोचायला २.५ तास तर परत येताना फक्त आर्धा तास लागला. बोटीचा प्रवास दीड तासाचा होता. बोटीवरच फ्रांस मधे लागणारे सॉकेट converter विकत घ्याला लागतात. भारतीय दोन पीन charger तिथे without converter चालतात.पण three pin plug वेगळा आहे तिथला.
फ्रांस मध्ये वाहतुक आपल्या वाहतूकीच्या विरुद्ध दिशे ने होते. म्हणजे दोन दिशांना जाणार्या वाहनांची दिशा उलटी आहे. आणि गाड्या सुद्धा left hand drive आहेत.
दोन वाजता वाटेतच जेवणासाठी थांबलो.आपल्या हाय वे वर असतो तसाच तो एक फुड प्लाज़ा
होता.फ्रांस मधे व्हेज लोकांचे हाल आहेत.सॅन्ड वीच सोडून काहीच व्हेज मिळत नाही.आणि त्यात भाषेचा प्रॉब्लेम. फ्रेंच लोकं अजिबात इंग्लीश बोलत नाहीत. इंग्लीश बोलणर्या लोकांना ते डिमांड देत नाहीत. ब्रेड सारखी काहीतरी कडक कडक गोष्ट पोटात घुसवली आणि गाडीत परत आलो.गाडीत मालामाल विकली सिनेमा चालू होता. पाच च्या सुमारास पॅरिस जवळ पोचलो. पॅरिस चा विमानतळ शहरापासून खूप लांब आहे.आणि पॅरिस ला जाणारा महामार्ग runway खालून जातो ! परत येताना याच ठिकाणी आम्हाला विमानदिसलं.
सातच्या सुमारास हॉटेल मध्ये पोचलो.lovotel massy palaseu हे त्या three star हॉटेल चा नाव.हॉटेल च्या रूम प्रशस्त आणि सुंदर होत्या. फ्रेश झाल्यावर हॉटेल च्या डाइनिंग हॉल मधे भारतीय जेवण वारपून जेवलो. fruit salad,पापड ,बटाटा वडा ............. नावं ऐकूनच पाणी सुटलं तोंडाला.अनेक महिने घराचं जेवण मिळालं नाही कि मग अशा जेवणावर तुटून पडायला होतं.रात्री एकाच्या लॅपटॉप मधे सगळे फोटो ट्रान्स्फर करून tv बघता बघता झोपून गेलो.


आवडलं!
ReplyDeleteमस्त!
ReplyDelete