विचित्र स्वभावाचे इंग्रज
आमच्या ऑफीस मधे दोन स्पेशल "नग" आहेत. वयानी असतील 35-40 मधले, मध्यम वयिन. तर विचित्र गोष्ट अशी की दोघेही सदा सर्वदा हातात एक एक बॉल घेऊन फिरत असतात. ऑफीस मधे इथून तिथे जाताना भिंतीवर काय आपट,टप्पे काय झेल,काही ना काही तरी उद्योग चालू असतो बॉल बरोबर. बॉल पण साधा नाही बर का. आपल्या कडे bouncy बॉल मिळतो ना,तसा पण आकाराने मोठा. निर्धास्त पणे काचेच्या दारावर ,भिंतींवर सुद्धा फेकतात चेंडू. कुणाला लागेल याची जास्त पर्वा करत नाहीत. ( खरं तर अनेक वर्षांच्या प्रॅक्टीस नंतर त्यांचा नेम इतका पक्का झालाय की तो बॉल त्याच्या गन्तव्य स्थळा खेरीज कुठेही दुसरी कडे जात नाही. ) असा एखादा नग भारतातल्या ऑफीस मधे असता तर तो बालिश नाहीतर वेडा म्हणावला गेला असता. पण इथे त्यांचं कोणाला अप्रूप वाटत नाही . "आपल्याला रुचेल ते करावे,दुसर्यांची पर्वा न बाळगता" हा इकडच्या लोकांचा स्वभावच आहे . आणि खरच इतर लोकांना काहीही घेणं देणं नसतं तुम्ही काय करताय (पब्लिक मधे), काय घातलय, काय खाताय याच्याशी.
लोकं बिनधास्त पणे चित्रवीचित्र कपडे आणि हेयर स्टाइल करून ,काहीही "चाळे" करत, खात अथवा "पीत" रस्त्यावरून चालताना दिसतात. कधी कधी त्यांचा हा अवतार बघून हसू आवरत नाही. पण आता सवय झाली आहे या सगळ्या गोष्टींची. काही दिवसांनी मी असा विचित्र पणा करायला नाही लागलो म्हणजे बर. :)


Arrey, write a blog or two in English! I find reading marathi tough :P ... Have to ask Sohan to read it for me....
ReplyDeleteYa blog madhe railway madhala foto ka lawalay? Tyat koni wichitra kapade wala disat tari nahiye..
ReplyDelete