Saturday, 4 July 2009

मिनी युरोप टूर

मिनी युरोप टूर

२० जुलैला शॅन्गेन वीसा एक्स्पायर होणार होता. वीसा साठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी निदान दोनदा तरी युरोप मधे जाणं आवश्यक होतं. पहिली ट्रिप पॅरीस-फ्रांस ची झाली होती. दुसऱ्या ट्रिप साठी बेल्जियम, नेदरलॅंड, जर्मनीची निवड केली. कारणं तशी अनेक होती.. एक तर तीन नवीन देश बघायला मिळणार होते, टूर बऱ्यापैकी स्वस्त होती, स्टार टूर च्या सहली मधे काही सिटस रिकाम्या होत्याशिवाय टूर फक्त चार दिवसाची होती(सुट्‍टीचा जास्तप्रोब्लेम नाही आणि कंटाळा येण्याच्या आत घरी परतणार होतो.)

सहलीचं बुकिंग ऑनलाईन केलं. मागच्या वेळेप्रमाणे सहल वेंब्ली पासून निघणार होती. सकाळी ५:३० पर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचं होतं. या वेळी माझ्या राहुल(अधिक माहिती साठी मागचे काही ब्लोग वाचा :)) नामक मित्राने त्याच्या स्वतःच्या गाडीतून मला आणि माझ्या तिघा मित्रांना वेंब्ली पर्यंत सुखरूप पोहोचवलं. कपडे आणि काही दैनंदिन वापरातल्या गोष्टी सोडून जास्त सामान बरोबर नव्हतं. सर्वात महत्वाची म्हणजे खाण्याचा एकही पदार्थ बरोबर घेतला नव्हता कारण तिन्ही वेळेचं खाणं स्टार टूर वाले देणार होते. आणि हे भारतीय खाणं आमच्या सारख्या बॅचलर लोकांसाठी मेजवानी होती. मागच्या सहलीतल्या रूचकर पदार्थांची चव अजूनही जीभेवर रेंगाळत होती.

सगळे प्रवासी भारतीय असूनही आमच्या कोच ने भारतीय प्रमाण वेळ(कमीत कमी १ तास उशीरा) पाळली नाही. गाडी अगदी वेळेत निघाली डोव्हर च्या दिशेने. मागच्या वेळेपेक्षा जहाज प्रवासाची exitement या वेळेस जरा कमीच होती, कारण त्याच बोटीने त्याच बंदरापासून त्याच बंदरा(कॅले)पर्यंत जाणार होतो. या वेळी मात्र प्रवासाच्या दिड तासापैकी १ तास सी गल पक्ष्यांनी आमचं मनोरंजन केलं. अगदी हातावर बसून बिस्कीट खाण्यापर्यंत ते
माणसाळले होते.

कॅले ला पोहोचल्यावर आमच्या कोचने ब्रसेल्स कडे प्रयाण सुरू केले. फ्रांस सोडून बेल्जियम मधे प्रवेश केल्यावर
एका चॉकलेट फॅक्ट्री पाशी आमचा कोच थांबला. नानाविध चॉकलेटस पाहून आणि चाखून(चवीसाठी) झाल्यावर फॅक्ट्रीच्या मागच्या रिकाम्या जागेत बुफे डिनर झाला. आमच्या बससोबत संपूर्ण प्रवासभर, स्वयंपाक करण्यासाठीचा कॅरेव्हन होता. आमच्या विश्रांतीच्या ठिकाणी आमच्या आधी पोहोचून जेवण तयार ठेवत होते.आचारी गुजराथी असल्याने सहजीकच अत्यंत चविष्ट आणि गरमागरम पदार्थांची रेलचेल होती. अगदी ढोकळ्या पासून साजूक तुपातील शिऱ्या पर्यंत चे सर्व पदार्थ जेवायला घालून सगळ्यांचं मन जिंकलं होतं त्यानी. जेवणानंतर मसाला चहा पिण्याची सवय सुद्धा त्यानेच लावली. मनसोक्त जेवण झाल्यावर ब्रसेल्स कडे निघालो. आमचा टूर मॅनेजर तर गप्पा मारण्यात आणि किस्से माहिती सांगण्यात expert होता. गाडीतील प्रत्येकाला समोर बोलवून हातात माईक देऊन बोलतं केलं त्यानी. सहाजिकच सगळ्यांची ओळख वाढली. आमच्या गाडीत तब्बल १० डॉक्टर आणि ३ लंडन मेट्रो चे रिटायर्ड ड्रायवर निघाले. जवळ जवळ ७०% पब्लिक गुजराथी होतं(अमेरीकेवरून आलेलं)
.

ब्रसेल्सला पोहोचेपर्यंत तीन वाजले होते. हे शहर म्हणजे बेल्जियम आणि युरोपियन युनियन ची राजधानी. युरोप मधल्या सर्वच शहरांसारखे अत्यंत स्वच्छ आणि टापटीप शहर. काचेच्या ऊंच इमारती असलेच्या आधुनिक भागातून आमची गाडी मुख्य आकर्षण असणाऱ्या ग्रंड प्लेस (grandplace)
पाशी आली. पार्किंग पासून हा शहराचा मुख्य आणि अत्यंत सुंदर चौक जरा दूर होता. चालत चालत चौकाकडे निघालो. हा चौक अत्यंत विशाल होता. चारही बाजूंनी मेडिव्हियल, कोरीव इमारतींनी वेढलेला. ऊंच आणि कोरीव चर्च सर्वात लक्षवेधी होतं. आजूबाजूच्या सर्व इमारती या ठिकाणच्या व्यापारी संघटनांची हेड क्वार्टर होती अशी
माहिती आम्हाला देण्यात आली.याच चौकात बेल्जियम मधील सुप्रसिद्ध गोदीवा चॉकलेट चं मुख्य दुकान आहे. दर दोन वर्षांनी, एका आठवड्यासाठी या चौकात ट्युलिप फ़ुलांचा गालिचा घातला जातो. चौकाच्या एका अरूंद गल्लीतून प्रसिद्ध अश्या मेनेकेन पिस स्टॅचू (manneken pis statue)पाशी पोहोचलो. सर्वप्रथम हि मुर्ती कुठे दिसेनाच
! नंतर निरखून बघितल्यावर चौकाच्या कोपऱ्यार एक छोटी मूर्ती दिसली. अवघी २ ते अडीच फूट उंचीची "शू" करणाऱ्या मुलाची मुर्ती होती ती. या उघड्या पोराला म्हणे देशोदेशीच्या राजा राण्यांनी कपडे भेट केले होते. आम्ही गेलो तेव्हा याने नाविकाचे कपडे घातले होते. फोटो काढून झाल्यावर त्या परिसरात जरा हिंडलो. अनेक म्हातारे कपल्स रस्त्यावरील रेस्टोरंट च्या बाहेर बसून व्हिस्की/दारू (त्यांचं पाणी) पित बसले होते. हवा सुद्धा तशी खूप
गरम होती. काही वेळातच त्या चौकात डॉग शो सुरु झाला. १० मिनिटाचा शो संपल्यावर हिंडत हिंडत बसपर्यंत पोहोचलो. वाईट गोष्ट म्हणजे याच
वेळी माझ्या मित्राचं पाकिट एका अल्जेरियन(त्याने सांगितल्याप्रमाणे) माणसाने मारलं. बॉलिवूड बद्दल गप्पा मारत हा माणूस त्याच्या जवळ आला होता. हे काम त्याने
इतक्या सफाईपणे केले होते कि त्या दिवशी रात्री हॉटेल वर पोहोचेपर्यंत आम्हाला या गोष्टीची कल्पना सुद्धा आली नाही. जेव्हा हि गोष्ट लक्षात आली त्यावेळी आम्ही दुसऱ्या देशात होतो
(नेदरलँड) :( ....

आमच्या गाडीच्या जवळच पुण्याच्या केसरी टूर्स ची गाडी उभी होती. अनेक दिवसांने एवढे मराठी बोलणारे लोक भेटल्याने जरा खूश झालो मी. या गाडीतले बरेचसे लोकं रिटायर्ड आजी आजोबा होते. आमच्या आणि केसरी टूर चे मॅनेजर सुद्धा एकमेकांना चांगलेच ओळखत होते.

पुढचं ठिकाण होतं ऍटोमियम. या ठिकाणी लोखंडचा(fe) एक मोलिक्यूल एक करोड पटींनी मोठा करून त्याची एक भव्य प्रतिकृती बनवली होती. अत्यंत भव्य अश्या प्रतिकृती सोबत फोटो कढून झाल्यावर हॉटेल
च्या वाटेने निघालो. नेदरलॅंड मधील झोतेरमियर नावाच्या ठिकाणचं गोल्डन ट्युलिप नावाच्या हॉटेल मधे पुढील २ दिवस आमचा मुक्काम होता. ऍमस्टरडॅम पासून जवळ जवळ १ तास दूर हे हॉटेल होतं.

नेहमी प्रमाणे रुचकर असे जेवण झाल्यावर शतपावली साठी जवळच्या रेल्वे स्टेशन वर जाऊन आलो. रात्री रूम
वर परत येऊन झोपेपर्यंत १२ वाजले होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल तर्फे देण्यात येणारा कॉन्टीनेन्टल नाश्ता उरकून मदुरोदॅम या ठिकाणी मिनी हॉलंड बघायला निघालो. हॉलंडमधील प्रमुख वास्तू छोट्या स्केल मधे या ठिकाणी तयार केल्या होत्या. छोट्या रेल्वे, बस, विमाने, रोप वे बघून दिवाळीतल्या किल्याची आठवण झाली. मुख्य म्हणजे सर्व प्रतिकृती ंमधे यांत्रिक हालचाली होत्या. हे प्रदर्शन बघताना हरवून गेलेलं मन भानावर आलं ते सुरु झालेल्या पावसाने.....

गाडीत परत आल्यावर पावसाने सुद्धा विश्रांती घेतली. काही वेळातच चीज आणि क्लॉग फॅक्टरी या पुढच्या ठिकाणी पोहोचलो. चीज तयार करण्याची पद्धत ९० वर्षाच्या तरूणीने (तिच्या चेहेऱ्यावर एक सुद्धा सुरकुती नव्हती) अत्यंत मनोरंजकपणे समजावून सांगितली. हॉलंडच्या गाई म्हणे दिवसाला ३० लिटर दूध देतात...... चीज चे
वेगवेगळे प्रकार बघून झाल्यावर क्लॉग(लाकडी बूट) तयार करण्याचं प्रात्यक्षिक बघितलं. या ठिकाणी आमरस पूरीचं जेवळ उरकून हॉलंड ची खासियत असलेल्या एका पुरातन पवनचक्की पाशी गेलो. पूर्वी या पवनचक्यांचा उपयोग पाणी उपसण्या साठी किंवा गिरणी म्हणून होत असे. सध्या बंद पडलेल्या या पवनचक्या हॉलंडचा ऐतिहासिक वारसा म्हणून उभ्या होत्या. या ठिकाणी फोटो काढून झाल्यावर प्रवासातल्या सर्वात सुंदर अश्या वोलेंदाम फिशिंग व्हिलेज मधे पोहोचलो.
या ठिकाणी प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे समुद्र आणि जमिनीची पातळी. समुद्राची पातळी जमिनीच्या चक्क १,२ फूट वर होती! एक धरणवजा भिंत समुद्र आणि जमिनीला विभागत होती. हॉलंड ची बरीचशी जमिन हि समुद्रातून खेचून काढलेली आहे याचा प्रत्यय या ठिकाणी आला. गाव खरचं खूप सुंदर होतं. पुरातन काळापासून आधुनिक काळा पर्यंतच्या सर्व प्रकारच्या होड्या या ठिकाणी बघायलामिळाल्या. समुद्र किनारी आणि किनाऱ्यावरच्या मार्केट मधे फिरण्यात वेळ कसा गेला हे कळलचं नाही.

या ठिकाणाहून निघून आम्ही ऍमस्टरडॅम शहरात प्रवेश केला. सर्व प्रथम डायमंड कटींग फॅक्टरी ला भेट दिली. डायमंड कटिंग मधील बारकावे आणि हिऱ्याची किंमत ठरवणारे चार c(carat, color, cut, clarity) या ठिकाणी समजावून घेतले. यानंतर पाळी होती ऍमस्टरडॅम क्रूज ची. ऍमस्टरडॅम शहर कालव्यांचं शहर आहे. याच कारणाने ऍमस्टरडॅम शहराला वेनीस ऑफ द इस्ट सुद्धा म्हणतात. दिड तसाच्या होडी प्रवासात संपूर्ण शहराचं दर्शन घडलं. तसं फारसं सुंदर किंवा स्वच्छ शहर नव्हतं हे.. अरूंद घरं हे या ठिकाणचं वैशिष्ठ... सर्वात अरूंद घर तर ५२ सेंटीमीटर रूंद आणि ३ मजले उंच होतं. अरूंद घरांचं कारण सुद्धा तसच होतं, पूर्वी म्हणे घराच्या दर्शनी भागावर टॅक्स ठरवला जायचा. या मुळे सगळीच घरं अरूंद होती. प्रत्येक घराच्या वरच्या मजल्यावर फर्निचर खिडकीतून आत घेण्यासाठी हूक होता. काही ठिकाणी तर कालव्यांमधे होडीवजा , अधिकृत घरं होती. टूर गाईड ने दिलेल्या माहिती नुसार दर आठवड्याला जवळ जवळ ३ गाड्या या कालव्यांमधे पडतात. :)

होडीतून बाहेर पडून ऍमस्टरडॅमच्या मुख्य रस्त्यावर आणि मुख्य चौकापाशी तास भर हिंडलो आणि हॉटेल वर परतलो.

तिसऱ्या दिवशी नाश्ता उरकून हॉटेलचा निरोप घेतला आणि जर्मनी च्या दिशेने निघालो. जोरदार पावसाने आमचं जर्मनी मधे स्वागत केलं. काही वेळातच कलोन या शहरातील डोम कॅथेड्रल पाशी पोहोचलो.
ख्रिश्चन लोकांची हि पवित्र वास्तू दोन विश्व युद्धाचा सामना करून तशी च्या तशी शाबूत होती. अत्यंत भव्य आणि कोरीव चर्च बघून पुढचा प्रवास सुरू केला.

वाटेत एका पार्किंगच्या ठिकाणी भर पावसात बुफे जेवण जेवलो. :) अतिशय सुंदर अश्या रस्त्यावरून जर्मनी आणि विश्वयुद्धाचा इतिहास ऐकत बोप्पार्ड या ऱ्हाईन नदी वरच्या छोट्या गावात पोहोचलो. रम्य आणि शांत गावाचा फेरफटका मारून दिड तासाच्या अत्यंत मनोहारी अश्या ऱ्हाईन क्रूज साठी होडी मधे शिरलो.

पावसाळी वातावरण,नदीच्या किनाऱ्यावरील गावं ,डोंगर , किल्ले बघताना मन प्रसन्न झालं. दिड तासच्या सुंदर प्रवासानंतर आम्ही एका वेगळ्याच गावात पोहोचलो
जिथे बस आमची वाट बघत उभी होती.
बस मधे बसल्या वर फ्रॅंन्कफर्ट या तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. संध्याकाळचे जेवण उरकून आमच्या बरोबर असणाऱ्या, १४ दिवसांच्या युरोप सहलीच्या प्रवाश्यांचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लंडन च्या दिशेने निघणार होतो आणि हे सर्व जण स्वित्झर्लंड मधे शिरणार होते. रात्री शहरात चक्कर मारण्यासाठी निघालो, पण निम्या वाटेतूनच परत आलो. कारण उशिर झाल्यास हॉटेल मधे परत येण्याचं काही साधन उपलब्ध नव्हतं.

सहलीचा चौथा दिवस तसा बोअरच होता. ७ तासाचा कॅले पर्यंतचा प्रवास. वाटेत ब्रसेल्स शहरात मदुरोदॅम सारखेच मिनी युरोप हे प्रदर्शन पाहिले. तेवढेच सुंदर होते हे प्रदर्शन..... या ठिकाणी पॅक्ड लंच खाऊन ४ पर्यंत कॅले मधे पोहोचलो. या ठिकाणी ब्रिटिश पोलिसांकडून आमचं चेकिंग झालं. तिथून समुद्रमार्गे डोव्हर आणि पुढे लंडन ला पोहोचे पर्यंत रात्रीचे १० वाजले होते.

सर्व सहप्रवाश्याना निरोप देवून रेल्वे पकडून रॉयस्टन मधे परत आलो. गेल्या सात महिन्यात ६ देशांमधे जाऊन आलो होतो मी!







Saturday, 27 June 2009

NRI च्या दृष्टीकोनातून..............

NRI च्या दृष्टीकोनातून..............


प्रवास केल्याने ज्ञानात भर पडते, हे काही खोटं नाही. नवे देश, नवी संस्कृती, नवीन लोकं सर्वच गोष्टी ज्ञानात भर घालतात. युरोप च्या टूर मधे बहूतेक सहप्रवासी NRI होते. बरचसे NRI हे अमेरीकन असतात हे वेगळं सांगायची गरज नाही. :) त्यांचे अनुभव , सल्ले ऎकण्याची संधी या सहलीत मिळाली.

पहील्याच दिवशी गाडीत सगळ्यांनी आप आपली ओळख करून दिली होती. ६०% प्रवासी हे रिटायर्ड पेन्शनर होते. प्रत्येकाची मुलं ही डॉक्टर किंवा इंजीनियर.......प्रथीतयश कंपन्यांमधे काम करणारी. ३० % लोकं ही ब्रिटन मधली डॉक्टर कपल्स होती. इग्लंड मधे एवढे भारतीय डॉक्टर आहेत याची मला अजिबात कल्पना नव्हती. आमचा टूर ओपरेटर तर सांगत होता की पूर्वी जवळ जवळ ९०% प्रवासी हे डॉक्टर असायचे. आणि त्यांना वाटायचं कि कोणत्यातरी मेडीकल कॉन्फरन्स साठी सगळ्यांना घेऊन निघाले आहेत कि काय......... बाकीचे १० टक्के आमच्यासारखे software engineer. डेप्यूटेशन वर आलेले. एकटे, नाही तर बायको बरोबर.

टूर बरोबर ४ दिवसात तीन देश फिरणं म्हणजे खरं तर एक marathon चं होती. तरीही प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जरा निवांत वेळ मिळाला आणि गप्पा सुरु झाल्या. आमच्या बरोबर दोन गुज्जु फॅमिली होत्या. या लोकांशी बरीच ओळख झाली होती. त्यातलाच एक पक्का गुज्जु businessman ओबामाला शिव्या घालत होता. तो पर्यंत मी सुद्धा ओबामाची एकच बाजू ऎकली किंवा वाचली होती ज्यात ओबामाची स्तुती आणि बुशला शिव्या घातल्या गेल्या होत्या. तर या गुज्जुच्या मते तो आणि त्याचा मित्र हे अमेरिकेच्या २% सर्वात श्रीमंत लोकांमधले होते. अमेरीकेत यांची हॉटेल्सची चेन होती.ओबामा बद्दल चे त्याचे विचार ऎकण्या सारखे आहेत । त्याच्या मते त्याच्या सारखी २% श्रीमंत लोकं संपूर्ण अमेरीकेच्या इन्कम टॅक्स मधली ७० % रक्कम भरतात आणि तो स्वतःच्या कष्टाच्या कमाईतली ५०% रक्कम सरकारला देत आहे. श्रीमंतांना लुटून काम न करण्याऱ्या, बसून खाणाऱ्या गरीबांमधे पैसे लुटण्याची ओबामाची पॉलिसी आहे आणि याच कारणामुळे तो जास्त लोकप्रिय आहे. त्याच्या मते अमेरीकेतील श्रीमंत लोकांवर ओबामाने अत्याचार सुरू केलाय. याच्या पेक्षा बुश हजार पटींनी चांगला होता. हा ओबामा काही वर्षात अमेरीकेची नक्कीच वाट लावणार असं ठाम पणे सांगत होता तो .

ते काहीही असू दे , अमेरीकेचा त्याला जाज्वल्य अभिमान होता.
या अभिमानाच्या (आणि पित असलेल्या विस्कीच्या) भरात भारत काय इग्लंडला पण नावं ठेवून झाली. त्याच्या "गाव"ची लोकं कशी चांगली आहेत, वर्ण,वंशद्वेष अजिबात नाही हे फार कौतूकाने सांगत होता. आम्हाला तर स्वतःचं कार्ड देवून आग्रहाचं निमंत्रण केलं. शिवाय आम्हा बॅचलरांना "फुकट"चा सल्ला सुद्धा दिला कि लंगड्या, लुळ्या, आंधळ्या कशाही असू दे; एका अमेरीकन पोरीशी लग्न करा आणि तिकडे या... घटस्फोट तो मिळवून देईल आणि आमची आख्खी लाईफ बनवेल! :) काही गुजराथी मुली सजेस्ट करेपर्यंत त्याची मजल गेली...... :) त्याची ही इंग्रजी तली बडबड ऎकण्यात खूप मजा आली आणि किवही आली त्याच्या विचारसरणीची......

Saturday, 30 May 2009

कार सेवा

"कार"सेवक.......


हा लेख सत्यघटनेवर आधारीत आहे.........लेखातील पात्र आणि घटना काल्पनिक नसून वास्तवतेशी त्यांचा फार जवळचा साध्यर्म्य आहे।


अरेरे फारच सिरीयस झालात तुम्ही वाचून ... विसरून जा पहिली दोन वाक्यं! उगाच टाकली आहेत। :-)


तर हा लेख आयोध्या आणि राममंदिराशी निगडीत नाही हे तुमच्या सारख्या चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेल। हा लेख आहे एका खऱ्या खुऱ्या कार सेवकावर. हा सेवक म्हणजे माझा इग्लंडमधील रूममेट. अत्यंत भक्तीभावाने याची सेवा चालू आहे. कंगाल झालो तरी बेहत्तर पण कार आराधना सोडणार नाही असा त्याचा पण.


वरील विधानांचा संदर्भ जाणण्यासाठी आपल्याला चार आठवडे काळाच्या मागे जावे लागेल.
शनिवारची सकाळ होती। सुट्‍टीचा दिवस असल्याने उगाच लोळत पडलो होतो. अचानक हा मित्र (याला आपण राहूल म्हणूया ) माझ्या रूम मधे आला आणि म्हणाला "आज मी कार विकत घेणार" आधी मला वाटलं राहूल झोपेत बडबडत आहे. पण नाही, तो पूर्णपणे शुद्धीत होता. अरे कार म्हणजे काही भाजीपाला आहे की घेतली पिशवी आणि निघालो मंडईत॥ सेकंड हॅंड असली तरी काय झालं ... पण राहूलला कारप्रेमाने झपाटलं होतं. काहीही करून आज त्याला कार आणायची होती.


मग आमच्या सर्वांचं नेटवर कार संशोधन सुरू केलं। दोन तासांनी वोल्कस वॅगन कंपनीची पसात नावाची गाडी राहूलला पसंत पडली। फोटोमधे नवी कोरी वाटत होती. त्या मानाने किंमत सुद्धा कमी होती (राहूल साठी बरं का! गेले दिड वर्ष ओनसाईट आहे तो. ). फक्त ७५० पाऊंड. लगेचच मालकिण बाईंना फोन केला. सॉरी बाई नाही ,तरूणी. फोनवर ७०० मधे सौदा पक्का झाला. तिला चेक चालणार नव्हता. ए टी एम चं ३०० पाऊंड चं लिमीट होतं आणि शनीवार असल्याने बॅंकांचा हाफ डे त्यामुळे त्या सुद्धा बंद. शेवटी आमच्या दोघांच्या(मी आणि आमचा तिसरा रूममेट) अकाऊंट मधून उधारी घेण्याचं ठरलं. ’ती’ वेगळ्या गावात रहात असल्यामुळे एक तिसरी जागा ठरवली जिथे आम्ही भेटणार होतो. आधी तिचा विश्वासच बसत नव्हता कि ठरलेल्या ठिकाणी आम्ही येऊ! तीन चार वेळा फोन करून तिने खात्री करून घेतली. राहूल ला जरा टेन्शन आलं होतं. यु के लायसन असलेल्या आमच्याच कंपनीतल्या एकाला घेऊन आम्ही निघालो(याला सुद्धा महत्प्रयत्‍नानंतर युकेचं लायसन मिळालं होतं, हा तर राहूलच्या वरचढ होतो. ३ वर्षापूर्वी ३००० ची स्पोर्ट्स कार याने घेतली होती यानं! पण कार ची खूप माहिती होती त्याला).


मालकीण बाई जरा उशीराच आल्या। आपल्या ३ सखींबरोबर. नुकत्याच झोपेतून उठून (बहुतेक त्याच तोकड्‍या कपड्‍यात) चौघी आल्या होत्या. गाडीचे चहूबाजूंनी निरीक्षण करण्यात आले. आर्ध्या तासांची टेस्ट ड्राईव्ह झाली. गाडी तशी दहा बारा वर्ष जूनी असूनही सातव्या मालकाकडे येईपर्यंत धडधाकट होती. उगाच काहीतरी कारण काढत ६०० ची ऑफर केली. जास्त घासाघीस न करता ६५० हि किंमत पक्की झाली. लगेचच पैसे काढून तिला देण्यात आले. आता प्रश्न होता लीगल प्रोसिजरचा. पण ती तर फारच सोप्पी निघाली. एका कागदावर "हि गाडी अमूक अमूक कडून अमूक अमूकला विकण्यात येत आहे" असं लिहिण्यात आलं. खाली दोन अमूकांची सही. त्याची एक कॉपी इकडच्या वाहतूक विभागाला गाडीच्या काही कागदपत्रासोबत पाठवण्यात आली. बास....झालं.......


राहूल आता या विदेशा मधे कार चा मालक झाला होता। पण या काररूपी पांढऱ्या हत्तीला पाऊंड रूपी उस चारून तिची सेवा करावी लागेल याची कल्पना नव्हती त्याला.


पहीला उस, इन्शुरन्स। कार चालवणाऱ्याचा आणि कारचा दोघांचा इन्शुरन्स आवश्यक असतो इथे. मुख्य रस्त्यावर पोलिसांच्या गाड्‍या असतात. त्यांच्याकडे सगळ्या कार चा अप टू डेट डेटाबेस असतो. एखादी अन इन्शुअर्ड कार दिसली कि दिसली, तिचा पाठलाग होतो. आणि त्या कारला (मालकाला जेल) कचरापेटीत डंप करण्यात येतं. या ठिकाणीतर दोघांचाही इन्शुरन्स नव्हता. तसा इन्शुरन्स ऑनलाईन पण मिळतो पण गाडी खूप जूनी असल्याने भारतीय लायसन कोणीही इन्शुरन्स द्यायला तयार नव्हतं. आणि खरं तर राहूलचं भारतीय लायसन पण मेलं (एक्सपायर्ड झालं) होतं (१ वर्ष होऊन गेल्याने). आता त्याच्या कडे गाडी होती पण तो ती रस्त्यावर नेऊ शकत नव्हता.


"युके लायसन" हा या हत्तीचा आवडता उस! प्रोव्हिजनल (लर्निंग) लायसन साठी ६० पाऊंड खर्च होता। तसं हे लायसन दोन दिवसातच आलं पण अट अशी होती कि या लायसनवर गाडी चालवताना शेजारी ३ वर्ष युके लायसन वाला पाहीजे होता. फक्त फायदा असा की या लायसन वर इन्शुरन्स मिळू शकत होता. "फक्त" १३०० पाऊंडामधे वर्षभराचा इन्शुरन्स मिळाला. हि रक्कम गाडीच्या किंमतीपेक्षा दुप्पट होती! पहिला धक्का!


धक्यांची श्रुंखला चालू राहीली जेव्हा युकेचं पर्मनंट लायसन च्या खर्चाचा अंदाज आला। गाडी शिकण्याचे धडे ( ज्या शिवाय लायसन मिळणं अशक्य होतं), लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षाची फी एकूण ८०० च्या घरात जात होती. हे म्हणजे कोंबडी आणि मसाल्यासारखं झालं.


बिच्चारा राहूल. सध्या लपवून छपवून गाडी चालवतोय. ही कारसेवा फारच महाग पडत आहे. पण त्याने ध्यास सोडलेला नाही आणि त्याला जास्त दुःख पण होत नाहीये. असते काही जणांना क्रेझ! लेखी परीक्षेचा जोरदार अभ्यास चालू आहे त्याचा. आपण सर्व मिळून त्याला शुभेच्छा देऊया!

Wednesday, 22 April 2009

scotland tour

निराळ्या अनुभवांची सहल...... स्कॉटलंड


एप्रिल महिना जसा जवळ येत होता तशी डोक्यात विचारांची चक्रं फिरु लागली होती. कारण एप्रिल च्या दुसऱ्या आठवड्यात सलग ४ दिवस सुट्‍टी होती इस्टर ची. आधी विचार होता भारतात जाण्याचा, पण ४ दिवस म्हणजे फारच धावती भेट झाली असती आणि कंपनी सुट्‍टी द्यायला तयार नव्हती. मग विचार केला, चला अजून एखादा नवीन देश बघून
घ्यावा. आधी प्लॅन होता ऍमस्टरडॅम, जर्मनी वगैरे बघायचा.
पण जो पर्यंत विचार पक्का झाला तो पर्यंत सगळ्या टूर्स चं बुकिंग फुल झालं होतं. आता स्कॉटलंडला पर्याय नव्हता.


स्कॉटलंडला जाण्यासाठी कार चं बुकिंग ऑनलाईन केलं. त्यानंतर प्रवासात सर्वात उपयोगी पडलेल्या सॅटेलाइट नॅव्हिगेटर (टॉम टॉम/ वाटाड्या) चं बुकिंग केलं. या उपकरणा बद्दल विस्तृत विवेचन करणं आवश्यक आहे. खरं सांगायचं तर य टॉम टॉम शिवाय आमची सहल होऊच शकली नसती. इच्छित स्थळा पर्यंत मार्ग दाखविणे हे याचे सगळ्यात बेसिक काम, पण या खेरीज अनेक गोष्टिंसाठी उपयोगी पडले हे उपकरण. उदाहरणार्थ, वेगाची मर्यादा न पाळल्यास ऐकू येणारा बीप, इच्छित स्थळा पर्यंतचं अंतर, लागणारा वेळ, सर्वात सोइस्कर रस्ता, पर्यायी रस्ता, जवळची प्रेक्षणीय ठिकाणे, पेट्रोल पंप, होटेल, स्पीड कॅमेऱ्याची ठिकाणं, शहराचा नकाशा, राउंड अबाउट मधील नेमकं एक्झीट या सर्व गोष्टी आमच्या सारख्या नवख्या चाल
कांसाठी आणि प्रवाश्यांसाठी फार आवश्यक होत्या. आमच्या ड्रायवरांनी(माझे कंपनीतले मित्रच) आत्तापर्यंत एकदाही इकडच्या रस्त्यावर गाडी चालवली नव्हती. दोघांनीही भारतात खूप चालवली होती गाडी पण इकडचे रस्ते आणि वाहतुकीच्या नियमां बद्दल दोघेही निरक्षर होते. त्यामुळे आमच्या पेक्षा आमचे सिनीयरच जास्त चिंतीत होते."सुखरूप परत येणार का नाही" आणि आले नाही तर "कामाचं काय होणार" हि शंका सगळ्यांच्या डोक्यात होती. त्यामुळे गाडी आणल्यावर एका अनुभवी ड्रायवर (माझा रूममेट) बरोबर आमच्या दोन मित्रांना २ तास प्रशिक्षण देण्यात आलं. (खरचं आवश्यक होतं हे प्रशिक्षण !)


या नंतर कुठे कुठे जायचं आणि कुठे रहायचं हा मोठा यक्षप्रश्न होता. तसा चौघांनाही देश नवीन होता, आणि पाहण्याची खूप ठिकाणं आहेत असं ऐकून होतो. शेवटी अनेक दिवसांच्या चर्चा चर्वणा नंतर रहायची आणि पहायची ठिकाणं ठरली. सर्वात स्वस्त अश्या यूथ होस्टेल मधे तीन दिवसांचं बुकिंग केलं. या होस्टेल बद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. प्रत्यक्षात राहण्याचा अनुभव विलक्षण होता. ते नंतर सविस्तर सांगीनच!


निघायच्या आदल्या दिवशी फोर्ड फोकस ही गाडी घेऊन जोरदार खरेदी केली खाण्यापिण्याची. गाडीचं एक्स्टा लार्ज बूट(डिकी) पुर्ण भरून गेलं होतं या सामानानी. हेच सामान आम्हाला ३ दिवसांपर्यंत पुरून उरलं ! गाडी बरोबर एक्स्टा प्रोटेक्शन सुद्धा विकत घेतलं होतं, जेणेकरून गाडी सह आम्हाला काही झालं तर नंतर भुर्दंड नको. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० ला निघायचं ठरलं कारण आमचा पहिल्या दिवशीचा मुक्काम जवळ जवळ ५५० मैल दूर होता आणि खूप हेक्टीक ड्राइव होतं . शिवाय १
२ नंतर रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होण्याचे चान्सेस होते. खाण्याचे पदार्थ करता करता आणि बॅग भरता भरता १२ कधी वाजले कळलच नाही.


दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे "साडे आठ"ला निघालो. तशी या गोष्टीची कल्पना होती मला. माझ्या मित्रांना पुरता ओळखून होतो मी. त्या मुळे मी सुद्धा निवांत उठलो होतो. टॉम टॉम च्या सहाय्याने मार्गक्रमण चालु झालं. सकाळची वेळ असल्याने दोघेही मित्र(ड्रायवर) उत्साहात होते. आती उत्साहाच्या भरात गाडी कधी कधी १२० मैल/किमी म्हणजे जवळ जवळ १९० च्या स्पीड नी पळवत होते. रोडच होता तसा. या मुख्य रस्त्यांना इथे मोटर वे म्हणतात. रस्त्यावर काही ठराविक अंतरा नंतर इंधन, फूड स्टॉल, स्वच्छ्तागृह उपलब्ध करून देणं हा नियम आहे या रस्त्यांसाठी. भरभाव वेगानी केंब्रिज, बर्मिंगहॅम ,लिवरपूल, मॅनचेस्टर, प्रेस्टोन आदी शहरांना बाय बाय करत निघलो होतो. वाटेत एके ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर मात्र
आम्ही ट्रफिक जॅम मधे अडकलो. त्या नंतरच्या एक तासात आमची गाडी फक्‍त ५ ते १० मैल अंतर कापू शकली. यातून सुटका झाल्यावर मनोहारी अश्या लेक डिस्ट्रीक्ट मधे प्रवेश केला. चहूकडे दिसणारी हिरवळ आणि निवांत चरणाऱ्या मेंढ्या हेच दृश्य काही तास दिसत होतं.


संध्याकाळच्या सुमारास स्कॉटलंड मधे प्रवेश केला. बाहेरील निसर्ग सौंदऱ्यानी जणू काही जादूच केली आमच्यावर. गाडीचा वेग आपोआप मंदावला. सगळ्यांचे कॅमेरे बाहेर निघाले आणि बाहेरील निसर्ग टिपू लागले. वाटेत डिझेल साठी एका पंपा वर थांबलो. स्वतःच्या हातानी डिझेल भरलं, कार्डानी पेमेंट करून पुढे निघालो.एडिनबर्ग (स्कॉटलंड ची राजधानी) मधे पोहोचे पर्यंत साडे सहा वाजले होते. होस्टेल मधे पोहोचायच्या आधी एका सुंदर तळ्याजवळ गाडी थांबवली. खरंतर ते तळं नसून खाडी होती. जवळच विमानतळ असल्यामुळे खूप कमी उंचीवरुन विमानं उडत होती. याच्या किनाऱ्यावरच तंबू ठोकून राहावं असं वाटण्यासारखा सुंदर होता सगळा परिसर. आणि घडलं सुद्धा तसंच. काहीच अंतरावर दिसणारी एक जुनी महाला सारखी दिसणारी वास्तू आमचं ग्लोबट्रेकर होस्टेल निघालं.


१०० एक लोकांची व्यवस्था होइल इतकं मोठं होतं ते होस्टेल. सगळ्यात वाखाणण्याजोगं होतं ते त्याचं व्यवस्थापन आणि सुविधा. तसं म्हणावं तर भारतीय धर्मशाळेच्या / डोर्मेट्री लेवल चं हे निवासस्थान. पण सर्व सुविधांनी युक्‍त. शेअर्ड किचन, मोठी लाउं
ज (सोफ़े असलेली रूम),टिव्ही रूम, नेट कॅफे पासून बार पर्यंतच्या सगळ्या सोई होत्या आत. हं ,राहण्याची जागा जरा गिचमीडीची होती एवढच. कारण बेड जे होते ते एकावर एक दोन. गेल्यागेल्याच आम्हाला प्रत्येकाला एक स्वाइप कार्ड आणि लॉकर ची चावी देण्यात आली. आमची रूम ६ जणांसाठीची आणि मिक्सड्‍ (मुलं मुली एकत्र ) कॅटेगरीमधली होती. आणि आम्ही होतो ४ जणं. उरलेले दोन जणं किंवा जणी कोण असतील याचा विचार चालला होता. पण शेवट पर्यंत म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी निघे पर्यंत आम्हाला कळलं नाही कोण होते ते दोन जणं, पण कोणीतरी दुसरं होतं हे नक्की! (तसे पुरावे होते रूम मधे :)) काही वेळानी फ्रेश होऊन मुख्य शहर बघायला निघालो. साडेसात वाजले असूनही बाहेर लख्ख सूर्यप्रकाश होता.(हाच तर फायदा आहे "समर"(युद्ध नव्हे!) मधे सहल काढण्याचा)


शहराची वास्तूरच
ना पॅरीस च्या जवळ जाणारी होती. अगदी तेवढी सुंदर नसली तरी बऱ्यापैकी आकर्षक. जायचं होतं मुख्य चर्च आणि लायब्रेरी बघायला ,पण सगळ्यात मुख्य प्रश्न होता तो पार्किंग चा. एक तर मुख्य शहरात पर्किंगचे भरमसाठ दर (तासाला २ पाउंड), आणि अनेक ठिकाणी चालू असलेली रस्त्याची कामं या मुळे १५ मिनीटं त्याच भागात घिरट्या मारत होतो(थंक्स टू टॉम टॉम ,जो जास्त त्रास देत होता). शेवटी चर्च च्या जवळच फ्रि पार्किंग सापडलं. आणि चालत जाणे या उपायावर सगळ्यांचं एकमत झालं.


चर्च आणि त्याच्यासमोरचा पुतळा(काय माहीत कोणाचा ते) खूपच छान होता. जवळच स्कर्ट मधेले दोघं जणं बॅगपाईपर वाजवत होते. छान वाटत होता त्याचा आवाज. तसा आपल्या सनई जवळ जाणारा पण जास्त घुमणारा. त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर चालत निघालो. रस्त्यात एक विद्युत रोषणाई ने सजवलेला महाल दिसला. जवळ जाऊन बघतो तर ते रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड चं हेड ऑफिस निघालं. असच फिरता फिरता नॅशनल लायब्रेरी पर्यंत चालत गेलो. त्याच ठिकाणी एका पूलावरून एडिनबर्ग शहर आणि रेल्वे स्टेशनचं विहंगम दृश्य दिसले. संध्याकाळचा अंधार शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालत होता. फोटो सेशन संपल्यावर परतीची वाट धरली, कारण जवळ जवळ दहा वाजत आले होते.


होस्टेलवर आल्यावर आमच्या परममित्रांनी(हेच आमचे ड्रायवर बरं का) बार चा रस्ता धरला. आम्ही आपले त्याला साथ म्हणून आत गप्पा मारत बसलो. दोघांचं मनसोक्त पिऊन झाल्यावर शेअर्ड किचन मधे जेवण केलं. करकरीत चादर, उशीचे कव्हर आणि डुवेट चे कव्हर घालून झोपेपर्यंत १२ वाजले होते.


सकाळी लवकरच उठलो, कारण बाथरूम आणि शॉवर सुद्धा शेअर्डच होते. साडेनऊच्या आत होस्टेल कडून कॉंप्लिमेंटरी नाश्ता होता. तोच नेहमीचा, कॉर्न फ्लेकस ब्रेड बटर ,जॅम ;ज्यूस चहा आणि कॉफी. आमचं बऱ्यापैकी लवकर आवरून झाल्याने मॉर्निंग वॉक साठी तळ्याकाठी गेलो, कोवळी ऊन्हं विस्तिर्ण पसरलेली हिरवळ, सी गल पक्षांचा आवाज याने दुप्पट उत्साह संचारला. नाश्ता करून होस्टेल ला बाय बाय केला आणि मुख्य कॅसल/किल्ला पहायला निघालो.


टॉम टॉम ने या वेळेस सुद्धा खूप भरकटवलं. ती त्याची चूक नव्हती, शहराच्या मुख्य रस्त्यावर ट्रॅम चं काम चालु होतं. त्यामुळे वाहतूकीमधे खूप बदल केला होता. आता ते त्याला कसं कळणार! तो आम्हाला घुमून फिरवून त्याच ठिकाणी आणत होता जिथे रस्ता बंद होता. काही वेळानी वैतागून एके ठिकाणी गाडी पार्क केली. एक तासाचं तिकिट काढून मुख्य रस्त्यावरून फिरत निघालो.


जवळच्या एका मेमोरिअल पार्क मधे गेलो. याच ठिकाणी त्या साधूचे दर्शन घडलं. (फोटो बघा :)) मग आम्ही शहराच्या मध्यभागी असणाऱ्या कमानी पाशी गेलो.(नाव वगैरे विचारू नका) तिथे बरेच फोटो काढून मार्केट हिंडत गाडी पाशी आलो. सुदैवाने तिथे एक ट्रॅफिक पोलिस भेटला, त्यानी आम्हाला किल्या पर्यंतचा बरोबर रस्ता दाखवला आणि टॉम टॉम फेकून देण्याचा एक फुकट सल्ला दिला.


किल्याखालीच पार्किंग करून एका भव्य वळणावळणाच्या दगडी रस्त्याने किल्यापर्यंत पोहोचलो. तिथे जाऊन बघतो तर काय, मला तर भारतात पोहोचल्यासारखं वाटलं. किल्ला पहायला आलेल्या लोकांमधले एक चतुर्थांश लोकं भारतीय वाटत होते. या टूर मधे एक गोष्ट कळून चुकली, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, अशी कोणतीही जागा नाही जिथे भारतीय पोहोचला नाही. अगदी ग्लेन नेव्हीस(ज्या निर्मनुष्य ठिकाणी आमची गाडी पंक्चर झाली होती(दुसऱ्या दिवशी)अगदी तिथे सुद्धा एक साउथ इंडीयन कुटुंब भेटले होते )


किल्याच्या प्रवेशद्वारापाशीच भली मोठी रांग दिसली. रांगेची मला आधीपासूनच चीड आहे. इथे तर तिकिटासाठी तब्बल दीड तास तात्काळत उभं रहायला लागलं. तिकिटा बरोबर एक ऑडिओग्राफ सुद्धा भाड्‍यानी घेतला. मोबाईल सारखे हे यंत्र कानाला लावून किल्याचा इतिहास ऐकता येणार होता. किल्याची खूप चांगल्या प्रकारे देखभाल केली होती. आत एक खूप मोठं प्रदर्शन होतं ज्या मधे इंग्लंड आणि स्कॉटलंड मधील दीर्घकालीन लढाईचा संपूर्ण इतिहास आकर्षक रीत्या मांडला होता. वर्षानुवर्ष जतन केलेल्या ४ राजेशाही निशाण्या(सोन्याची तलवार, गुलाब, मुकूट, चौथी गोष्ट विसरलो! )तिथे बघायला मिळाल्या. अशी ३/४ प्रदर्शनं होती आत. काही वेळानी मात्र या गोष्टींचा कंटाळा आला. मग मात्र फोटो सेशन संपवून किल्याला राम राम ठोकला. गाडी कडे परत येताना वाटेत एके ठिकाणी स्कॉटीश वाईन चे प्रदर्शन पाहीले. आमच्या मित्रांनी महागड्‍या वाईन बरोबर स्वतःचे फोटो काढून घेतले. तो पर्यंत अडीच वाजले होते. आणि पोटात कावळ्यांनी कोलाहल माजवला होता. मग गाडीत बसूनच दुपारचं जेवण उरकलं आणि इनव्हरनेस चा रस्ता पकडला.


वाटेत फोर्थ नदी वरचा सुप्रसिद्ध! रेल्वे पूल बघितला. कलकत्याच्या हावडा पूला सारखाच होता तो, पण खूप लांब(४/५ किमी असेल). मग मात्र निसर्गाच्या कुशीतून आमचा प्रवास सुरु झाला. गर्द हिरवी सुरू ची झाडं, हिमाच्छादीत गिरीशिखरं, वळणावळणाचा रस्ता, छोटे झरे,धबधबे.......जणू काश्मिरच! वाटेत तीन ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबलो.


इनव्हरनेसला पोहोचेपर्यंत ७ वाजले होते. होटेल चा पत्ता दिल्यावर टॉम टॉम ने आम्हाला एका जीर्ण इमारती समोर आणून सोडलं होतं. त्या ठिकाणी बॅग पॅकर्स नावाचं होस्टेल होतं, पण आमचं बुकिंग मात्र इनव्हरनेस टूरीस्ट होस्टेल मधे होतं. जवळच एका पार्किंग वर गाडी उभी करून १५ ,२० मिनीटं इकडे तिकडे शोधत बसलो. शेवटी चौकशी अंती असं कळलं हि ज्या कळकट्‍ट होस्टेल समोर आमची गाडी थांबली होती तेच आमचं होस्टेल होतं. एकाच होस्टेल ची दोन नावं! शिवाय होस्टेल चं मुख्य दार सुद्धा लपवल्या सारखं कोपऱ्यात.दारापाशी जाऊन बघतो तर दार आतून लॉक होतं आणि दरवाजा उघडण्यासाठी एक कोड टाकायला लागणार होता. दारावर गिचमीडीत अक्षरात लिहीलं होतं "रिसेप्शन बंद आहे, आपले बुकिंग असल्यास खालील नंबर वर संपर्क साधा........" जरा वैतागलोच आम्ही. फोन केल्या वर एका माणसानी दरवाजा उघडण्याचा कोड दिला आणि शेवटी रिसेप्शन पाशी आम्ही पोहोचलो. बाहेरून जितकं खराब वाटत होतं तितकं काही खराब नव्हतं आतून. रिसेप्शन वर एक चित्रविचित्र कपडे घातलेला तरूण बसला होता. आम्ही बूक केलेली ४ जणांची रूम उपलब्ध नसल्याचा खुलासा त्याने अत्यंत गोड शब्दात केला. आणि आम्हाला इतर दोन रूम्स मधे राहावं लागेल असं सांगितलं. त्या रूम्स होत्या ४ आणि ८ लोकांसाठीच्या. नाईलाजास्तव तो पर्याय आम्ही स्विकारला. पण या गोष्टीची आम्हाला तीळमात्र कल्पना नव्हती की ,आमचे बाकीचे रूम पार्टनर मुली असतील म्हणून! एका खोलीत ६ दुसऱ्या खोलीत २...............


त्या रात्री सुद्धा आमच्या ड्रायवर मित्रांच्या "पेया"ची सोय म्हणून पब शोधत भटकलो. शनिवार ची रात्र असल्याने रस्त्यावर जिथे पाहावं तिथे दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या पोरी आणि पोरं दिसत होती आणि दिसत होते त्यांना आवरायला उभे असलेले पोलिस....... एका जुन्या दिसण्याऱ्या पब मधे मित्रांनी मनसोक्त पिऊन मनःशांती करून घेतली. त्याच ठिकाणी १५ मिनीटांच्या काळात दोन आजोबांशी(ते पण टुन होते :)) गट्‍टी जमली. ख्रिश्चन धर्मावर एक गंभीर चर्चा घडली . :)


तिथून परत रूम वर आलो. कॉमन रूम मधे जेवण उरकून झोपायला आप आपल्या खोलीत गेलो.रूम वरच्या मुलींशी बोलण्याचा जास्त योग आलाच नाही, कारण रात्री आम्ही उशीरा आलो होतो. आणि सकाळी त्यांची निघायची गडबड होती. सकाळच्या गप्पांमधे कळलं की त्या जर्मनी वरून फिरायला आल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी त्यांची सकाळची फ्लाईट होती.


सकाळी उरकून नाश्ता करे पर्यंत साडे दहा वाजले होते. चेक आउट करावं म्हणून रिसेप्शन पाशी गेलो तर तिथे कुणीच नव्हतं आणि त्या खोलीचं दार सुद्धा बंद होतं. पुन्हा त्याच नंबर वर कॉल केला आणि त्याने खोलीची चावी रिसेप्शन च्या दाराखालच्या फटीतून आत सरकवण्यास सांगितले !


अश्या या दिव्य होस्टेल ला निरोप देऊन थोडा वेळ इनव्हरनेस शहर फिरलो आणि लॉकनेस चा रस्ता पकडला. लोक्‌ म्हण्जे तळं. स्कॉटलंड च्या या डोंगराळी भागात खूप सुंदर तळी आहेत. या सर्वांची नावं लोक्‌ ने सुरू होतात. या तळ्याच्या काठानी नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात आमची गाडी मार्गक्रमण करत होती. वाटेत दोन तीन ठिकाणी ब्रेक घेतला. त्यातला एक ब्रेक फारच लकी ठरला. कारण याच ठिकाणी एका आधुनिक कोळ्याशी आणि त्याच्या भयावह कुत्र्याशी आमची मैत्री झाली. तळातल्या माश्यांचे प्रकार , आधुनिक फिशींग रॉड, माश्यांचे बेट(गळाला लावण्यात येणारे किडे) अश्या अनेक गोष्टींची सविस्तर माहिती मिळाली. आणि तो कुत्रा सुद्धा साधासुधा नव्हता. कुत्रा आणि लांडगा यांचं हायब्रीड होतं ते. याच ठिकाणी बर्फासारखा थंड पाण्यात उभं राहून फोटो काढण्याचे २,३ प्रयत्‍न केले.


पुढचं ठिकाण होतं, उर्कहार्ट कॅसल. हा किल्ला लोकनेस तळ्याच्याच काठी होता. अत्यंत दिखणा किल्ला! आत तसं काही जास्त पाहण्यासारखं नाही असं ऐकून होतो. त्या मुळे १२ पाऊंड चं तिकिट न काढण्याचं ठरवलं. बाहेरूनच अनेक फोटो काढले आणि बेन नेव्हीस कडे वाटचाल सुरू केली. वाटेत द्वितीय विश्वयुद्धात मरण पावलेल्या स्कॉटीश सैनीकांच्या स्मृतीत बांधलेले अत्यंत दिखणे असे मेमोरीयल लागले. जितक्या सुंदर मूर्ती तितकीच सुंदर नेव्हीस पर्वत रांग तिथे होती. या पर्वतश्रेणी मधील बर्फाची शाल पांघरलेली सर्वच शिखरं इथून नीट दिसत होती. आर्ध्यातासाचं फोटो सेशन संपवून बेन नेव्हीस रोप वे कडे निघालो.


या रोप वे चे दोन झोन होते. ए झोन हा निम्या वाटेपर्यंत नेऊन सोडत होता. बी झोन हा शिखरापर्यंत पोचण्यासाठी होता ज्या ठिकाणी स्किईंग ची सोय होती. आम्ही बी झोन चं तिकिट काढायला गेलो, पण आमची घोर निराशा झाली. उन्हाळा सुरू झाल्याने खूपसा बर्फ वितळला होता आणि स्किईंग खूप धोक्याचं झालं होतं. त्यामुळे बी झोन बंद करण्यात आल होता. दुसरा काही पर्याय नव्हता, पण ए झोन मधली रोप वे फेरी सुद्धा खूप छान होती. वरून दिसणारं दृश्य फारच मनोहारी होतं. आम्ही आपले हौस म्हणून या ठिकाणा पासुन काहीशे मीटर अंतरापासून सुरू होणाऱ्या बर्फाला शिवून परत आलो. या ठिकाणा पर्यंत पोहोचण्या साठी सायकलीचा एक खडतर मार्ग सुद्धा होता.


खाली उतरल्यावर जेवण उरकलं आणि टॉम टॉम च्या मदतीने फारश्या प्रसिद्ध नसलेल्या इन्वरलोकी या किल्या पाशी पोहोचलो. किल्ला तसा पडका पण खूप छान होता. या ठिकाणच्या नदीकाठी बराच वेळ निवांत बसलो. आणि ५ च्या सुमारास ग्लेन नेव्हीस कडे निघालो.


ग्लेन म्हणजे दरी आणि बेन म्हणजे शिखर असा लढवलेला तर्क बरोबर निघाला. वाटेतच एक कॅरवान कॅम्प लागला. आता ही काय नवीन भानगड? उन्हाळ्याच्या दिवसात इकडची बरीच लोकं आपलं चालतं फिरतं घर कार ला लटकवून या भागात येतात, त्यांच्या साठी खास सोई इथे असतात. या गाड्यांसाठी लाईट आणि पाण्याची व्यवस्था अशा दुर्गम आणि जंगली भागात कशी होते कुणास ठावूक. भाडं सुद्धा भरपूर घेत असतील. असो ! हौसेपाई ही लोकं पैशाचा जास्त विचार करत नाहीत.


याच रस्त्यावर अजून एक महत्वाची गोष्ट दिसली जी पाहील्याशिवाय स्कॉटलंड ची सहल अधूरी राहीली असती. ती म्हणजे जंगली गाय. खास आमच्यासाठी म्हणून ती अगदी रस्त्याच्या कडेला आली होती. तशी दिसायला आपल्या साध्या गाई सारखीच पण आकाराने जरा लहान आणि खूप केसाळ. तिच्या डोक्यावरचे केस तर इतके वाढले होते कि त्यांनी तिचे डोळे पूर्ण झाकले गेले होते. आमच्या फोटो साठी तिने मस्तपैकी ३/४ पोझ दिल्या आणि निघून गेली. आम्ही सुद्धा निघालो आणि ग्लेन नेव्हीस ला पोहोचलो.


सहलीतली सर्वात जास्त मजा आली ती इथे. गाडी पार्क केल्यावर लगेचच आमच्यातल्या एकाला गाडीचे पंक्चर झालेले चाक दिसले. हा तर अगदी निर्मनुश्य भाग होता. मग काय, गाडीचं मन्युअल आणि स्टेपनी ,स्पेअर टायर डिकी तून बाहेर काढलं आणि टायर बदलायला लागलो. सगळे स्क्रू काढून सुद्धा टायर काही निघत नव्हतं, १० मिनीटभर सगळ्यांचे शक्‍ती चे प्रयोग करून झाले. मदतीसाठी जवळपास कोणीच नव्हतं. शेवटी नाईलाजाने भाड्‍याने कार घेतलेल्या कंपनीला फोन लावला. त्यांनी मात्र बाकी काहिच चौकशी न करता आम्ही कुठे आहोत हे नीट समजावून घेतलं आणि तासाभरात रिकवरी व्हॅन येईल असं सांगितलं. आता आम्ही कोड्‍यात पडलो, गाडीपाशी थांबावं का खालच्या दरी मधे उतरावं कारण तासा भरात पूर्ण अंधार झाला असता आणि आम्हाला खालती जाता आलं नसतं . असा विचार करत असतानाच एक मेसेज आला कि रिकव्हरी व्हॅन १५ मिनीटात पोहोचेल. आणि खरचं १० मिनीटात मेकेनीक हजर. या जंगलात हा इतक्या लवकर हा कुठून आला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्यानी त्याची हत्यारं काढून ५ मिनीटात नवीन चाक बसवलं. त्याला शतशः धन्यवाद देवून आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला, आणि खालच्या सुंदर दरी आणि झऱ्याकडे निघालो. मजा म्हणून बर्फासारख्या थंड पाण्यातून नदी पार केली. पाण्यात मनसोक्‍त खेळून आणि फोटो काढून झाल्यावर परत आलो आणि फोर्ट विल्यम जवळच्या बेनविले गावातल्या अत्‍तापर्यंतच्या सर्वात सुंदर अश्या "चेज वाईल्ड गूज" या होस्टेल वर पोहोचलो.या ठिकाणी मात्र आम्हाला प्रशस्त आणि चौघांसाठी वेगळी रूम मिळाली. काही वेळात फ्रेश होऊन जवळचा सात मजली कॅनाल बघितला. हा कॅनाल या भागातील दोन वेगळ्या ऊंची वरची तळी जोडत होता. वास्तूकलेचा चमत्कारच! याच कॅनालवरच्या पूला वरून आम्ही होस्टेल पर्यंत गेलो होतो. हा पूल साधासुधा नव्हता ते दुसऱ्या दिवशी कळलं आम्हाला, जेव्हा एक उंच होडीला कॅनाल मधून वाट देण्यासाठी संपूर्ण पूल ९० अंशात फिरवला गेला!


जवळच्या एका भारतीय होटेल मधून जेवण पॅक करून आणलं. दुसऱ्या दिवशी खूप ड्रायविंग करायचे होते म्हणून लवकरच झोपलो.


प्रवासाच्या शेवटच्या दिवशीचं सर्वात पहिलं काम होतं ते पंक्चर काढण्याचं. आदल्या दिवशी फोन वर सांगितलेल्या ठिकाणी गाडी नेली. तिथे गेल्यावर कळलं की गाडीची टायर्स ट्यूबलेस होती आणि टायर २ठिकाणी फाटल्याने बदलायला लागणार होतं. खर्च होता २०० पाउंड(१४ हजार रूपये!) मोठ्‍ठा धक्का ! लगेचच आमच्या कार रेंटल वाल्यांना फ़ोन लावला आणि खात्री करून घेतली की या खर्चाचे पैसे परत मिळतील म्हणून. टायर बदलायचं पक्क झाल्यावर त्या गॅरेज मधे सुद्धा एक निराळा अनुभव मिळाला. अत्याधुनीक यंत्रांच्या सहाय्याने इतक्या सहज रीत्या मेकेनीक ने हे काम केले की ते फक्त पाहूनच आम्ही आश्चर्यचकीत झालो. झालेल्या खर्चाची रीसीट घेऊन इलीयन डोनन या सर्वात सुंदर सागरी किल्याच्या दिशेने निघालो.

या किल्यासाठी आम्हाला ६० मैल रॉयस्टनच्या विरूद्ध दिशेला जावं लागलं ,परंतु तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं कि या उलट्या दिशेचा प्रवास वाया गेला नव्हता. इतका सुंदर किल्ला होता तो ! या ठिकाणी मात्र आम्ही तिकीट काढून आत गेलो. जमिनी पासून किल्याला जोडणाऱ्या एका पूला वरून चालत गेलो आणि किल्यात प्रवेश केला. या किल्यामधे सुद्धा जुन्या स्कॉटीश वस्तूंचं एक अत्यंत सुंदर प्रदर्शन होतं ज्यामधे एक अवजड तलवार उचलण्याचा योग आला. हुबेहून जुने किचन तर फारच सुंदर होते. या ठिकाणचे सर्व पदार्थ मेणाचे होते. खूप वेळ किल्या वर फिरलो. पार्श्वसंगीत होतं दारापाशी उभं राहून बॅग पायपर वाजवणाऱ्या वादकाचं.


या ठिकाणाहून आमचं घर जवळ जवळ १० तास लांब होतं. दुपारी ३ वाजता परतीचा प्रवास सुरु केला. दोन जणं आलटून पालटून गाडी चालवत होते. ग्लेनको या अत्यंत सुंदर दरी मधून हा रस्ता जात होता.


ग्लोस्गो शहराच्या जवळ पुन्हा १ तास आमची गाडी ट्रफिक मधे अडकली, पण नंतर मात्र पूर्ण रिकामा रस्ता मिळाला. गाडितले उरलेले तीघेजणं आलटून पालटून झोपत होते. मी मात्र पूर्ण प्रवास भर ड्रायवर च्या शेजारी त्याला झोप येवू नये म्हणून जागा होतो.


रात्री १ च्या सुमारास अजून एक अडचण आली. संपूर्ण रस्त्यावर दाट धुकं पसरलं, अगदी २ मिटर वरचं काही दिसेना. शिवाय आमच्या गाडीला धुक्यासाठीचे स्पेशल दिवे नव्हते. शेवटी नशिबाने एक ट्रक आमच्या पुढे ओव्हरटेक करून आला. त्याच्या बॅकलाईटच्या आधाराने धीम्या गतीने गाडी नेत होते.


रॉयस्टनला पोहोचे पर्यंत अडीच तीन वाजले होते. पेंगुळलेल्या मित्रांना निरोप देऊन घरी परतलो. सुखरूप घरी पोचलो या गोष्टीवर काही काळ माझाच विश्‍वास बसत नव्हता. :)


लेखाला "निराळ्या अनूभवांची" असं टायटल का दिलं हे कळलं असेल ना आता?

Saturday, 14 March 2009

रोयस्टन चा फेरफटका

रोयस्टन चा फेरफटका
घरात बसून नेट आराधना करण्याचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मी एकटाच बाहेर पडतो. रस्ता फुटेल तिथे चालत राहतो. इकडची लोकं घराबाहेर चालत फिरताना दिसणं तसं दुर्मिळच. संध्याकाळी ४ वाजताच ‘गावा’तल्या मुख्य रस्त्यावर(हाय स्ट्रीट नाव आहे त्याचं) शुकशुकाट असतो. सगळी दुकानं तर ३,साडे तीनलाच बंद होतात. खरं तर हि दुकानं उघडी असो वा बंद काही जास्त फरक पडत नाही. बहुतेक वेळा या दुकानांमधे चिटपाखरू सुद्धा नसतं. का? कारण एकच, गावाबाहेर नवीनच उघडलेला टेस्को नावाचा शोपिंग मॉल. सर्व दैनंदिन गोष्टी एकाच ठिकाणी आणि स्वस्तात मिळत असतील तर कोण जाईल हो या दुकानांमधे? या मॉल संस्कृतीचे अनेक बळी इथे पाहायला मिळाले. शेकडो वर्षापासून चालणारी दुकानं अचानक बंद होऊ लागली. काहिंनी तर सरळसोट पणे पाटी टांगली होती "टेस्को मुळे आम्ही दुकान बंद करत आहोत". आपल्या सारख्या लोकांना वरदान ठरलेले मॉल अश्या प्रकारे किरकोळ विक्रेत्यांसाठी शाप सुद्धा ठरू शकतात हे कळून चुकलं.

ते जाउ दे. मी संध्याकाळच्या भटकंती बद्दल बोलत होतो. आशा वेळी तुम्ही एकटे भुता सारखे फिरत असता. रस्त्यावर कोणी असेल तर ,आपल्या कुत्र्याला घेऊन बाहेर पडलेला एखादा म्हातारा किंवा आपल्या पोराला बाबागाडी मधून फिरवायला बाहेर पडलेली एखादी ‘मम्मी’. सकाळच्या वेळेत तर फक्त १५ मिनीटांच्या वॉक मधे अशा ५,६ मम्मी आणि ३,४ कुत्रेवाले दिसतात. अनेक वेळेला एखादी छोटी सुद्धा आपल्या बाहुलीला बाबागाडीत ठेवून मम्मी आणि दुसऱ्या बाबागाडीतल्या धाकट्या भावाबरोबर फिरताना दिसते. अगदी ३ ४ महीन्यांच्या बाळाला सुद्धा मस्तपैकी गरम कपड्यांमधे गुंडाळून, बोचऱ्या थंडीमधे बाहेर पडतात या आया.


घराबाहेर पडणारी आणखी एक कॅटेगरी असते ती आजी आजोबांची. यांचे एक टोळकं रोज आमच्या बस मधून केंब्रिज ला जातं. ८०,९० वर्षांच्या या लोकांचा उत्साह पाहून थक्क होतो आपण. चालता न येणारे अनेक जण इलेक्ट्रिक व्हील चेअर वर फिरताना दिसतात. इकडचे पदपथ सुद्धा असे बनवले आहेत कि या गाडीवरून तुम्ही पूर्ण गावभर हिंडू शकता. रस्ता क्रॉसिंग च्या ठिकाणी यांना स्लोप दिले आहेत. अजून काय पाहिजे ?

कधी कधी एखादा टाईट कपडे घालून ‘रनिंग’ करताना दिसतो. तशी आम्ही सुद्धा अनेक वेळा ‘रनिंग’ करतो पर ती असते बस पकडण्यासाठी. घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या, मोनोटोनस आणि रुटीन फिरंगी आयुष्याचा कंटाळा येतो ४ ,५ महिन्यात. अशा वेळी भारतातलं रंगीबेरंगी, विविध सणांनी आणि सोहळ्यांनी नटलेलं आयुष्य हवंहवंस वाटतं.

Saturday, 7 March 2009

केशकर्तनालय

केशकर्तनालय

इंग्लंड मधे येऊन ४ महिने लोटले होते आणि माझे केस कानावरून गाला पर्यंत पोचले होते. लोकांना वाटलं , काहीतरी नवीन हेअर स्टाईल ट्राय करतोय मी. तशी हुषारी करून इथे यायच्या आधी केस जमेल तेवढे बारीक करुन आलो होतो.(हे असं सगळेच जणं करतात मी त्याला अपवाद नाही) पण आता काही दुसरा पर्याय नव्हता. डोकं इंग्रजी न्हाव्याच्या हवाली करायचं या विचारानीच माझं डोकं गरगरायला लागलं होतं.

तशी कारणं पण होती घाबरण्याची. गेले चार महिने या लोकांच्या हेअर स्टाईल बघून माझा पक्का समज झाला होता की इकडच्या न्हाव्यांना सरळ सध्या पद्धतीने केस कापता येत नाहीच मुळी. इकडुन कुरतडल्या सारखे काप, तिकडून कोणता तरी भडक रंग फास असा खेळ असतील बहुतेक. त्या मुळे काही दिवस भयानक स्वप्न पडत होती, ज्या मधे मी स्वतःला अश्या चित्रविचित्र केशरचने मधे बघत होतो.

दुसरं कारण होतं हजामतीच्या किमतीचं. ऐकून होतो की इकडचे न्हावी केसाबरोबर खिसा सुद्धा (फुकटात) कापतात. आपण कितीही सावध असलो तरी. पण काय करणार "अडला हरी इंग्रजी न्हाव्याचे ........... "

भारतातून निघताना मी तर असं सुद्धा ऐकलं होतं की परदेशात केशकर्तनालय फक्त बायका चालवतात. हे एक कुतूहल होतं ते नीराळंच.

शेवटी तो ऐतिहासीक शनिवार उजाडला.(हो,शनिवार. इथे रविवारी सगळी दुकानं बंद असतात आणि बाकिचे पाच दिवस आम्हाला वेळ नसतो. त्यामुळे नो ओप्शन ) मनाशी पक्का निश्चय केला होता, आज ही रिस्क घ्यायचीच. थोडी चौकशी करून स्वस्तातलं एक सलून हेरून ठेवलं होतं. "दि एज" हे त्याचं नाव. या "एज" वाल्या कडून दरी मधे ढकलले जाण्याची शक्यता कमी होती. कारण या न्हाव्यानी धड केस कापल्याची अनेक उदाहरणं माझ्या मित्रमंडळींमधे होती.

आत शिरल्या शिरल्या जॅकेट (आणि जीव) खूंटीला टांगलं. आणि त्याच्या खूर्चीत जाऊन बसलो. न्हावी कसला पैलवान (बोडी बिल्डर) होता तो. हात,पाय,गळा,खांदा, थोडक्यात काय संपूर्ण शरीर भर त्यानी टॅटू गोंदून घेतले होते. त्याचं ते रुप बघून अजूनच धडकी भरली. माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजी मधे मी त्याला केस बारीक करण्याचा "हूकुम" दिला. लगेचच त्यानी लाइट वर चालणारं मशीन बाहेर काढलं आणि सफाईदार पणे काम चालू केलं. हि लोकं केस कापताना कात्रीचा वापर खूपच कमी करतात. अगदी वस्तऱ्या पासून ब्रश पर्यंत सर्व उपकरणांसाठी लाईट वर चालणारे पर्याय यांच्या कडे आहेत.

२० मिनीटात माझी त्या गुंडाळलेल्या प्लॅस्टिक च्या कापडातून सुटका झाली होती.
अत्यंत व्यवस्थित कापलेले केश आरश्यात बघताना मी सुटकेचा निश्वास सोडला. अपेक्षेप्रमाणे यानी माझ्या पाकिटातले ८ पाउंड कापले होते. अरे इतक्या पैश्यात माझी ७ वर्षांची कटींग झाली असती भारतात ! आणि म्हणे स्वस्तातलं सलून :) अजून एक नवीन अनुभव मिळाला होता मला.

माझी चित्रे, मुर्त्या, रांगोळ्या..

Picasa SlideshowPicasa Web AlbumsFullscreen

Cycle

सायकल ............एक दिव्य!
जर मला कोणी विचारलं की तुझं आवडतं वाहन कोणतं ? तर माझं एकच उत्तर तयार असतं .....सायकल.कोणाला मर्सिडीज़ तर कोणाला फ़ेरारी चं क्रेझ असतं. माझी मात्र सायकल हिच पसंत. माझ्या कॉलेज मधल्या कोणालाही विचारा. कॉलेज मधल्या माझ्या प्रसिद्धीचं सायकल हे सुद्धा एक कारण होतं. तिसऱ्या वर्ष्या पर्यंत सायकल वर येण्याऱ्या काही मोजक्या जणांमध्ये मी एक होतो. सायकल म्हणजे स्वस्त आणि मस्त वाहन. ना इन्शुरन्स ची कटकट ना पेट्रोल च्या वाढत्या किंमतीचं टेन्शन. शिवाय ट्रॅफ़िक जॅम वगैरेची भानगड नाही. आणि त्यातून सायकल चालवण्याने होणारा व्यायाम म्हणजे तर बोनसच !
तर हे एवढे गुणगान या साठीच कि इथे इंग्लंड मधे आल्यावर पण सायकल चालवण्याची इच्छा झाली.पण इथे सायकल चालण्यासाठी भानगडी फार !फार कडक नियम बरं का सायकलीसाठी. एक तर सायकलीला पुढे मागे लाईट लावणे आवश्यक आहे.रात्रीच्या वेळी जाणार असाल तर फ्लोरोसंट रंगाचे भडक कपडे आणि जर पिशवी जवळ असेल तर त्यावर सुद्धा अश्याच रंगाचा पटटा लावावा लागतो. जर मुख्य रस्त्याने जाणार असाल तर डोक्यावर सायकलीसाठी मिळणारं हेल्मेट घालावं लागतं. एवढ्या सगळ्या कट्कटी मुळे अनेक महिने हे माझं स्वप्न (रूम वर सायकल असून सुद्धा)अपूर्ण राहिलं.
एका रविवारी अशीच हुक्की आली आणि वर वर्णन केलेल्यापैकी एकही गोष्ट न पाळता सायकलीवर बाहेर पडलो.( ट्रफ़िक पोलिस आत्तापर्यंत एकदाही बघितला नव्हता रॉयस्टन मधे शिवाय मी पण जवळच्याच एरीया मधे फिरणार होतो) मजा आली दुपारच्या वेळेत निवांत सायकल चालवायला. जवळ जवळ आर्धा तास असाच रस्ता फ़ुटेल तसा चालवत राहीलो सायकल.
एक गोष्ट आवडली एकडची, अनेक लोकं इथे बिन्धास्तपणे, हौशीने सायकल चालवताना दिसतात. यात वयाचं बंधन वगैरे अजिबात नाही. आमच्या ओफिसमधे तर दोन उच्च दर्जाचे ओफ़िसर सायकल वर येतात. त्यांचा सोशल स्टेटस त्यांच्या सायकल चालवण्या आड येत नाही. काश इंडिया मैं भी ऐसा होता :(आपल्या कडे कोपऱ्या कोपऱ्या वर आढळणाऱ्या स्वयंचलित दुचाकी तर क्वचितच आढळतात इथे. आणि ज्या आढळतात त्यांचा ऍव्हरेज म्हणे कार पेक्षा सुद्धा कमी असतो . मग का नाही जो तो कार चालवणार. आमच्या ओफिस मधली साठ वर्षाची रिसेप्शनीस्ट जेव्हा कार चालवत येताना दिसते तेव्हा मात्र थक्क व्हायला होतं. अरे रे सायकल वरून कार वर का घसरलो मी :) बघू भारतात परते पर्यन्त कार चालवण्याचा चान्स मिळतो का ते.

Sunday, 1 March 2009

दारूबंदी...........

दारूबंदी...........
लंडन च्या किंगक्रॉस स्टेशन वर आम्ही चार मित्र आमच्या ट्रेन ची वाट बघत उभे होतो. ट्रेन यायला अजून एक तास होता . त्यामुळे सहजचं इकडे तिकडे फ़िरत होतो.
अचानक एका प्लॅट्फ़ोर्म जवळ २० एक पोलिस दिसले. कुतूहल म्हणून जवळ गेलो. त्या ठिकाणी एक बोर्ड दृष्टिस पडला. संध्याकाळच्या काही ट्रेन ड्राय ट्रेन घोषित केल्या होत्या . म्हणजे ट्रेन मध्ये दारूबंदी.
या ठिकाणी एक गोष्ट क्लियर करायला पाहिजे, बियर दारू या सारख्या गोष्टी पिणे हि इकडची संस्कृती आहे. त्यात या लोकांना काहि गैर वाटत नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण दारू आणि सिगरेट च्या बाबतीत येथे महिला आघाडी वर आहेत.[पटत नसल्यास एन एच एस ची वेबसाईट बघा :)] मला पण पहिल्यांदा धक्का बसला होता. पण हि वस्तुस्थिती जेव्हा प्रत्यक्ष रोज दिसायला लागली तेव्हा मात्र माझा विश्वास बसला या आकडेवारीवर. एकदा दोनदातर आपल्या ३, ४ वर्षाच्या पोराबरोबर सिगरेत ओढत जाणारी बाई बघितली. मला दोघा मायलेकांची कीव आली. जाऊ दे, जरा भरकंटी झाली विषया पासून.
तर त्या ठिकाणी पोलिस लोकांच्या बॅग्स चेक करत होते. आणि याच तपासणी च्या वेळी एका बेवड्यांच्या टोळक्याशी पोलिसांची बाचाबाची झाली होती. त्यात ५,६ बाटल्या दारू जमिनीवर सांडली होती. १० मिनीटांतच जवळच ठेवलेला कचऱ्याचा कंटेनर दारूच्या बाटल्या आणि कॅन्स नी भरून गेला.
मजेची गोष्ट अशी कि आमच्या चौघांपैकी एक पटटीचा पिणारा होता. दारु वर त्याची निस्सीम श्रद्धा.त्याच्या डोळ्यांना ते दृश्य बघवेना. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी नासाडी बघून त्याचे डोळे भरून आले. :) आणि मग या लोकांकडून स्वस्तात दारू विकत घेण्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात आला.कारण आम्ही ज्या ट्रेननी जाणार होतो त्यात अशी काही बंदी वैगरे नव्हती. पण आम्हीच त्याला आडवलं. कारण? अरे हे काही भारतातले पोलिस नव्हते. जर असते तर त्यांनी निम्या बाटल्या स्वताःच्या घरी पाठवल्या असत्या.आणि अश्या वेळी आमचा मित्र जर तिथे जाऊन दारू खरेदी करत बसला असता तर त्यालाच पहिल्यांदा आत टाकले असते. ब्रिटीश कार्ट्यांचा निर्लज्ज पणा सुद्धा बघायला मिळाला तिथे. ट्रेन मधे परवानगी नाही म्हणून बिंधास्तपणे बाटल्या वर बाटल्या रिझवत होते ते तपासणीच्या ठिकाणी. आता बोला....................

Tuesday, 10 February 2009

महागडी आणि घातक लाइफ स्टाइल

पश्चिम कडील महागडी आणि घातक लाइफ स्टाइल
काल सकाळी सकाळी चहा पिण्याची इच्छा झाली ।पाणी चहा आणि साखर यांचं मिश्रण शेगडी वर ठेवलं आणि दूध घेण्यासाठी फ्रीज मधून कॅन बाहेर काढला आणि अचानक भारतातल्या दूध distibution system ची आठवण झाली. आपल्याकडे दूधा साठीचे तीनच पर्याय असतात. "भैया" चं दूध , प्लास्टिक च्या पिशवित मिळणारं चितळे किंवा शासकीय दूध अथवा क्वचित वापरलं जाणारं बाटलीतलं दूध. इकडे मात्र प्लास्टिक चे कॅन सोडून कोणताही पर्याय उपलब्ध नाही.


कचरा पेटी मधे पडलेल्या कॅन्स चा खच पाहून विचार आला की या देशात असे किती कॅन्स दररोज कचरापेटीत येत असतील? या canned milk system चे दोन दुष्परिणाम मला दिसतात।एक तर कॅन मुळे असणारी जास्त किंमत आणि त्याच्या वापरा नंतर होणारं प्रदूषण.आता तुम्ही विचाराल की प्लास्टिक च्या पिशव्यांमुळे प्रदूषण होत नाही का? नक्कीच होतं पण यातल्या खूपश्या पिशव्या recycle होतात. आता जर हे कॅन परत परत धुवून वापरत असतील तर मात्रमी वरचे विधान परत घेतो. :)


पण प्रश्न फक्त कॅन्स चा नाहीये, इकडच्या छोट्या छोट्या गोष्टीत ही महागडी आणि घातक चैन दिसून येते।घरातल्या प्रत्येक व्यक्तीची असणारी वेगळी कार असो , किचन मधील (किचन मधेच का, सर्वच ठिकाणी )भरमसाठ वापरला जाणारा टिशु पेपर असो , बाथरूम मधे असणारा आंघोळीचा एकमेव पर्याय ,टब असो किंवा छोट्या अंतरासाठी कार वापरण्याची सवय असो, सर्वच ठिकाणी प्राकृतिक साधनांचा दुरुपयोग आढळतो. tesco सारख्या मोठ्या मॉल मधे आणि कचरापेटी साठी करोडो प्लास्टिक पिशव्या दररोज वापरल्या जातात. यातल्या कितपत पिशव्या recycle होतात ,देव जाणे !


फारच टीका झाली ना यांच्यावर! तश्या काही चांगल्या सवयी पण आहेत यांच्या पण त्याबद्दल नंतर कधीतरी "आठवून आठवून " लिहीन :)

Monday, 9 February 2009

लिटिल चॅम्प्स

लिटिल चॅम्प्स
रविवार ,सुट्टीचा दिवस.काहीही कारण नसताना लवकर जाग आली. खिडकी मधून बाहेर बघतो तर नेहमी सारखे खराब वातावरण.गेला आठवडा भर हिम वृष्टी झाली होती. ढगाळ हवामान ,कडाक्याची थंडी आणि बर्फा मुळे झालेले घसरडे रस्तेही बाहेरची परिस्थिती. आजचा दिवस पण या बंदिस्त रूम मधे काढायचा आहे हे कळून चुकलं. आमचं घर हे 'बंदिस्त 'खोल्यांचं आहे .प्रत्येक जण स्वत: च्या रूम मधे दार बंद करून बसतो.अशा वेळेस करमणुकीचं एकच साधन ,२४ तास चालू असणारं broad band internet.
अशी उदास मनस्थिति असताना एकदम आठवलं ,आज तर सारेगमप लिटिल चॅम्प्स ची फाइनल आहे . रविवार च्या सुट्टीचा आणि ब्रॉड बॅंड internet चा पुरेपूर वापर करायचा ठरवलं. स्थानिक वेळेनुसार २ ला सुरू होणार होती फाइनल. चोरून झी मराठी चे फीड दाखवणार्या ३,४ साइट्स शोधून ठेवल्या .जेवण आटपून (तयार करून + जेवून ) १:३० ला तयार झालो. 'पूर्वरंगाचा ' कार्यक्रम चालू होता. चोरलेले प्रक्षेपण अत्यंत नीट व वीना अडथळ्याचे दिसत होते.
जशी जशी मूळ कार्यक्रमाची वेळ जवळ यायला लागली , तसा तसा मला या प्रक्षेपणात बदल जाणवू लागला.१० मिनिटा पुर्वी अत्यंत चांगले असणारे प्रक्षेपण बिघडू लागले. कधी कधी नुसता आवाज,कधी स्थिर चित्र ,तर कधी काहीच नाही अशी स्थिती झाली त्या सगळ्या साइट्स वर! माझ्या उत्साहा वर पाणी फिरवलं गेलं.शेवटी काय ,तर कार्यक्रम एन्जॉय करत दुपार घालवण्याचं माझं स्वप्न भंगलं.
नंतर विचार करत असताना जाणवलं की प्रक्षेपण बिघडणं साहजिकच होतं. मोजक्या ३,४ साइट्स वर अचानक एवढे लोड आल्यामुळे हे होणारच होते. या कार्यक्रमाच्या जागतिक लोकप्रियतेचा अंदाज आला.आणि का असु नये लोकप्रियता ?सर्वच लहान मुले ही एक चमत्कार होती ,आहेत. प्रथमेश ,आर्या ,मुग्धा ,कार्तिकी ,रोहित .....स्वर्ग लॉकीचे गंधर्वच जणू. एवढ्या लहान वयात असलेली संगीताची प्रगल्भता अचंभित करणारी होती.एवढ्या लोकप्रियतेनि सुद्धा त्यांची निरागसता हरवली नव्हती. आणि प्रत्येकाच्या गाण्याचं वेगळं वैशिष्ठ !आर्याच्या गाण्यातला गोडवा ,प्रथमेश च्या गाण्यातला शास्त्रीय आभ्यास,मुग्धा च्या गाण्यातली निरागसता, कार्तिकी चा गवरान ठसका,आणि रोहित चा रॉकिंग पर्फॉर्मेन्स मन प्रफुल्लित करून जातो.कार्यक्रमाच्या निकाला बद्दल काही खास उत्कंठा नव्हती .कारण सगळ्यांनी अवघ्या मराठी संगीत जगताला कधीच जिंकलं होतं.
शेवटी या सुरेल आठवणी स्मरत निवांत पणे ताणून दिली ! आता वाट बघायची , कोण सगळ्यात आधी अपलॉड करतो हा कार्यक्रम त्याची!(अरे रे ,झी मराठी , internet वरच्या साइट्स आणि अपलॉड वीरांना धन्यवाद द्यायचं विसरलोच होतो !धन्यवाद रे सगळ्यांना .)

Sunday, 18 January 2009

vichitra engraj

विचित्र स्वभावाचे इंग्रज

आमच्या ऑफीस मधे दोन स्पेशल "नग" आहेत. वयानी असतील 35-40 मधले, मध्यम वयिन. तर विचित्र गोष्ट अशी की दोघेही सदा सर्वदा हातात एक एक बॉल घेऊन फिरत असतात. ऑफीस मधे इथून तिथे जाताना भिंतीवर काय आपट,टप्पे काय झेल,काही ना काही तरी उद्योग चालू असतो बॉल बरोबर. बॉल पण साधा नाही बर का. आपल्या कडे bouncy बॉल मिळतो ना,तसा पण आकाराने मोठा. निर्धास्त पणे काचेच्या दारावर ,भिंतींवर सुद्धा फेकतात चेंडू. कुणाला लागेल याची जास्त पर्वा करत नाहीत. ( खरं तर अनेक वर्षांच्या प्रॅक्टीस नंतर त्यांचा नेम इतका पक्का झालाय की तो बॉल त्याच्या गन्तव्य स्थळा खेरीज कुठेही दुसरी कडे जात नाही. ) असा एखादा नग भारतातल्या ऑफीस मधे असता तर तो बालिश नाहीतर वेडा म्हणावला गेला असता. पण इथे त्यांचं कोणाला अप्रूप वाटत नाही . "आपल्याला रुचेल ते करावे,दुसर्यांची पर्वा न बाळगता" हा इकडच्या लोकांचा स्वभावच आहे . आणि खरच इतर लोकांना काहीही घेणं देणं नसतं तुम्ही काय करताय (पब्लिक मधे), काय घातलय, काय खाताय याच्याशी. लोकं बिनधास्त पणे चित्रवीचित्र कपडे आणि हेयर स्टाइल करून ,काहीही "चाळे" करत, खात अथवा "पीत" रस्त्यावरून चालताना दिसतात. कधी कधी त्यांचा हा अवतार बघून हसू आवरत नाही. पण आता सवय झाली आहे या सगळ्या गोष्टींची. काही दिवसांनी मी असा विचित्र पणा करायला नाही लागलो म्हणजे बर. :)

Saturday, 10 January 2009

Round abouts in england

इंग्लेंड चे round about
शिस्त बद्ध वाहतुकीचा एक नवीन प्रकार इथे दिसला आणि तो म्हणजे "round about" आता तुम्ही विचाराल हे round about म्हणजे काय ? तर राउंड अबाउट म्हणजे चौकात बांधलेला वर्तुळाकार आइलॅंड . असे आइलॅंड भारतात पण दिसतात पण त्यांचा खरा उपयोग दिसला तो इथे. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या क्रॉसिंग ला हे राउंड अबाउट आहेत.
हे राउंड अबाउट फक्त एका नियमावर चालतात."आपल्या डावीकडून राउंड अबाउट मधे येणार्‍या वाहनाला राउंड अबाउट आधी वापरून द्यावे."इंग्लीश वाहन चालक हा नियम इतक्या काटेकोरपणे पाळतात की या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचं कधीच आढळून येत नाही. मुख्य फायदा असा की चौकात ट्रॅफिक सिग्नल ची गरज पडत नाही आणि प्रवासाचा वेळ वचतो.इथे आल्यावर पहिले काही दिवस ही शिस्त बघून मी अवाक् झालो होतो. इंग्लीश लोकांच्या विनम्रता "दाखवण्याच्या" स्वभावाचा या ठिकाणी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे.
अत्यंत उपयोगी अशा या वाहतूकीच्या सिस्टम चा भारतात उपयोग होणं कठीण आहे. चौक क्रॉस करताना तू आधी की मी ही जी स्पर्धा चालू असते (मी सुद्धा एक स्पर्धक होतो !) अशा वेळेस हे राउंड अबाउट निष्फळ ठरतात.

Paris tour last.........

दिवस चार ( परतिचा दिवस)


सकाळी नाश्ता करून नऊ ला हॉटेल सोडले व २५ की मी दूर असलेल्या versallais palace कडे निघालो.
या ठिकाणी अत्यंत सुंदर असा महाल आणि १० एकर चं गार्डन आहे. पान झाडीचा ऋतू असल्याने गार्डन फारसं बहरलेलं नव्हतं.



गार्डन बघीतल्यावर महाल बघण्या ऐवजी आम्ही जवळच्या मार्केट आणि चर्च मधे गेलो.
१२.३० ला बस ने क्यॅलेस कडे प्रयाण सुरू केले.
गाडी मधे लगे रहो मुन्ना भाई चित्रपट चालू होता.४.३० ला calais ला पोहोचलो. तिथे ब्रिटीश इमिग्रेशन तर्फे आमच्या पास पोर्ट आणि वीसा ची तपासणी झाली आणि ६ वाजताच्या क्रूज़ ने परत डोवर कडे निघालो. तिथून wembley ला पोहोचे पर्यंत ९ वाजले होते. सहप्रवाश्यांना टाटा करून ट्यूब वा ट्रेन करून १ ला घरी पोहोचलो.

Paris tour day 3

दिवस तिसरा

तिसरा दिवस होता फ्रांस दर्शन करण्याचा.........नेहमी प्रमाणे नाश्ता करून ९ वाजता पॅरिस कडे निघालो. मेन शहरापासून हॉटेल तास भर दूर होतं.

सर्वप्रथम पोचलो concord square या फ्रांसच्या सर्वात मोठ्या आणि सुंदर चौकात. तिथे इजिप्त मधून आणलेला एक मोठा ओबेलिस्क ( उंच कोरीव खांब )होता.london eye ची कॉपी असलेला एक मोठा पाळणा पण त्याच चौकात होता.फोटो काढून झाल्यावर आम्ही french perfumary कडे निघालो.

वाटेतच प्रिन्सेस डायानाच्या अपघाताची जागा बघितली. त्या नंतर अत्यंत सुंदर अशा saint mary's church चे दर्शन झाले. corienthean order च्या ६० एक खांबांनी बनले होते हे चर्च.

त्यानंतर सर्वात सुंदर असे ओपेरा हौस बघितले. अत्यंत सुंदर आणि कोरीव मूर्ती हे या वास्तूचे वैशिट्य .
perfumery म्हणजे परफ्यूमचे संग्रहालय. या ठिकाणी परफ्यूम तयार करण्याची पद्धत पहिली आणि कळून चुकलंकी अत्तरे ही non veg असतात .संग्रहलयाच्या दुकानात महाग महाग अत्तरे विकायला होती.




त्या नंतर सुमारे ११.३० ला louvre museum मधे पोचलो. जगातील प्रथम क्रमांकाचं हे संग्रहालय ,मोनालिसा या चित्रा साठी विशेष प्रसिद्धा आहे. संग्रहलयाच्या जुन्या सुंदर इमारती खाली आधुनिक अशी entrance आणि parking तयार केली आहे. इथेच प्रसिद्ध असा काचेचा उल्टा पिरामिड बघितला.संग्रहालय खूपच मते आहे आणि ३ भागात divide केलेलं आहे. दोन तासात आम्ही फक्त दोनच भाग आणि ते सुद्धाअपूर्णच बघितले. मोनालिसा आणि विशेष प्रसिद्ध असलेल्या खूपश्या मूर्त्या पहिल्या. पिकासो ची मर्कट चित्रे( आधुनिक चित्रे ) बघून हसू आवरत नव्हतं. बरेच फोटो काढून बस मधे परतलो.

पुढचं ठिकाण होतं आयफेल टॉवर. या टॉवरच्या तिसर्‍या मजल्यावर आम्ही जाणार होतो. ही जागा ३२० मी उंचीवर आहे.वर जाण्यासाठी दोन लिफ्ट घ्याला लागतात.पहिली दुसर्‍या मजल्या पर्यंत जाते . तिसर्‍या मजल्याच्या लिफ्ट साठी आर्धा तास उणे ६ डिग्री तापमानात रांगेत उभं राहायला लागलं. पण ही थंडी गायब झाली जेव्हा तिसर्‍या मजल्यावरून फ्रांस चं विहांगम् दर्शन घडलं.खाली उतरताना मात्र जिन्या ने उतरलो.



paris by night ही रात्रीची टूर ८.३० ला निघणार होती. त्यासाठी हॉटेल मधे परतलो . फ्रेश होऊन आणि जेवून आम्ही तयार झालो रात्रीच्या सहालीसाठी.रात्रीच्या विद्युत रोषणाई मधे पॅरिस चं सौंदर्या अजूनाच उजळून निघत होतं . रात्री दर तासा आड होणार्‍या आयफेल टॉवर चा scintalling effect टिपण्यासाठी कॅमेरे सज्ज केले.५ मिनिटाचा हा शो संपल्यावर Arc da triumph हे इंडिया गेट सारखे प्रवेशद्वार बघितले. जगातील सुप्रसिद्ध अशा champselysees street (शोन्झलीझ ) चं दर्शन घेतलं. फॅशन चं माहेर असणार्‍या फ्रान्सचा हा लक्ष्मीरस्ता. सर्व सुप्रसिद्ध ब्रँड ची मोठी मोठी दुकानं या रस्त्यावर आहेत. हॉलिवूड अनेक नट या रत्यावर भेटतात म्हणे !सकाळी बघितलेल्या सर्व इमारती रात्री च्या प्रकाशात बघून ११.३० ला हॉटेलात आलो आणि झोपलो.

Paris tour part 2

दिवस दुसरा






बरोबर सकाळी ७ वाजता हॉटेल फोन ची रिंग वाजली.साडे आठ पर्यंत सगळे जाणं नाष्टयाच्या हॉल मधे एकत्र झाले .नाश्ता हॉटेल तर्फे होता , टिपिकल फ्रेंच नाश्ता. वेगवेगळे ब्रेड चे प्रकार ,कॉर्न फ्लेकस, चहा कॉफी,ओरेंग ज्युस,बटर,जाम वगैरे ..........




नाश्ता झाल्यावर सव्वा नऊ ला डिझनी लँड साठी बस मधे बसलो. त्या ठिकाणी बघण्याचे दोन पर्याय होते .डिझनी लँड स्टुडिओ किंवा डिझनी लँड पार्क .सगळ्यांनीच पार्क सेलेक्ट केली. दोन कारणं

1.पार्क जुनी असल्यानं तिथे खूप राइड्स होत्या, आणि


2. स्टुडिओ बोर आहे असा खूप जाणांकडून मिळालेला फीडबॅक.





पार्क चं तिकीट ६० पौंड आहे. पण एकदा आत गेला कि साठ पौंड वसूल होतात.२५ डिसेंबर असल्याने खूप गर्दी होती. तरीही आम्ही एकहीराइड सोडली नाही. आत शिरतानाच दर्शन झालं सुंदर कारंज आणि भव्य अशा इमारतीचं. तिकीट चेक झाल्यावर आत गेलो.डिझनी लँड चा नकाशा घेतला आणि सगळ्या अवघड आणि थरारक राइड्स शोधल्या. सर्वात आधी त्या राइड्स संपवण्याचं ठरलं . ३६० डिग्री फिरावणार्या आणि पोटात गोळा आणणार्‍या सगळ्याच राइड्स खूप एन्जॉय केल्या .






मग मात्र डिझनी लँड चं सौंदर्य टिपायला सुरवात केली. स्वप्नवत दिसणारे महाल जुन्या वाटणार्‍या इमारती ,सुंदर झरे धबधबे डोळ्यात भरून घेत होतो.
The line king मधला सिंबाचा live show बघितला.
सर्व काही बघे पर्यंत ५ कधी वाजले कळलच नाही.










आता वेळ होती ती प्रमुख आकर्षणाची..... once upon a lifetime parade. डिझनी ची सर्व कार्टून्स आणि अत्यंत आकर्षक रथ या परेड मधे होते. मधुर अशा संगीतवर नाचत नाचत परेड जात होती.त्या नंतर मुख्य महाल रंगबीरंगी दिव्यांनी उज्वलित झाला.सगळेच क्षण फोटो मधे टिपून घेतले.साडे सात पर्यंत बस मधे पोचायचं होतं ,म्हणून लवकर निघालो,पण तो एरिया इतका मोठा होता की परत येताना वाट चुकलो.हिंडत हिंडत finally बस मधे पोचलोसगळेच खूप दमले होते . हॉटेल मधे पोहोचेपर्यंत जवळ जवळ सगळेच झोपी गेले. त्या दिवशी पण संध्याकाळचं जेवण पोटभर खाल्लं आणिफोटो डंप करून झोपलो.

Paris tour (Pravas varnan)

फ्रांसची सहल

चोवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अशा चार दिवसाच्या सहलीसाठी जवळ जवळ एक महिन्या पूर्वी च बुकिंग केला होतं. एका गुजराती भारतीयाच्या मालकीच्या स्टार टूर्स बरोबर जायचं ठरलं होतं. france ला जाण्यासाठी schengen visa लागतो.त्यासाठी online appointment घेतली होती.दहा तारखेला वीसा साठी लंडन ला गेलो. तीन तासांच्या अत्यंत सुनियोजित प्रक्रियेनंतर आणि ५० पौंड खर्च केल्यानंतर ६ महिन्याचा schengen visa मिळाला. हा वीसा european union च्या कोणत्याही देशात चालतो.

चोवीस तारखेला सकाळी दोनलाच उठलो. पाऊणे सहाला london मधल्या wembley या ठिकाणी पोहोचायचं होतं. बरोबर कंपनी तलेच ४ बॅचलर होते.लंडन ला जाण्यासाठी आम्ही कार भाड्यानी घेतली होती.पण सगळ्यांचाच मनात भीती होती लंडन च्या रस्त्यांची ! आमचा च एक हौशी मित्र ड्राइवर आम्हाला "पोचवणार" होता.अनेक प्रिंट आउट काढून,पन्नास वेळा नकाशा घोकून सुद्धा व्हायचं तेच झालं.लंडन जवळच १ तासभर भरकटलो.नशीब चांगलं म्हणून कसेबसे साडे पाच ला wembley ला पोहोचलो.तिथे बघतो तर आधीपासूनच ५० जाणं येऊन थांबली होती. चार गाड्या (luxury coaches) भरून ,जवळ जवळ दोनशे एक "अनिवासी आणि प्रवासित भारतीय" पॅरिस फिरायला निघाले होते. आमच्या गाडीत खूपसे फॅमिली मेंबर होते.आणि शेवटच्या रांगेत आम्ही पाच जाणं.बस अगदी वेळेत सुटली .तासभरातच सर्व फॅमिली मेंबर ची छोटि छोटि पोरं आमची दोस्त मंडळी बनली.बस च्या मागच्याच रांगेतून गोधळचा आवाज येत होता.ब्राह्म मुहूर्तावर उठलेले बाकीचे सगळे गाढ झोपले होते.

थोड्याच वेळात आम्ही डोवर या ब्रिटीश बंदरात दाखल झालो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्र्यूज़ मध्ये शिरे पर्यंत काहीच चेक झालं नाही.पासपोर्ट,वीसा काहीच बघितलं नाही कुणी !जवळच्या एका आलिशान मॉल मधे युरो करेन्सी खरेदी केली . आणि आमच्या गाडिसकट सगळे क्र्यूज़ मधे शिरलो. दहा पंधरा वोल्वो सारख्या गाड्या आणि ५०० एक माणसं वाहून न्यायची केपॅसिटी होती ,त्या मोठ्या जहाजाची. डेक वर फोटो काढण्यात आणि duty free shopping mall फिरण्यात दीड तास कसा गेला कळलच नाही. एकाच्या सुमारास calais या फ्रेंच बंदरात दाखल झालो. या ठिकाणी सुद्धा काहीच चेकिंग झालं नाही. ( इंग्लेंड मधून आलेल्या लोकांवर जरा जास्तच भरोसा ठेवतात की काय ! ) पॅरिस २५० कि मी डोर होता अज़ून. इंग्लीश आणि फ्रेंच घडाळ्यात एक तासाचा फरक आहे.त्या मुळे फ्रांस मधे पोहोचायला २.५ तास तर परत येताना फक्त आर्धा तास लागला. बोटीचा प्रवास दीड तासाचा होता. बोटीवरच फ्रांस मधे लागणारे सॉकेट converter विकत घ्याला लागतात. भारतीय दोन पीन charger तिथे without converter चालतात.पण three pin plug वेगळा आहे तिथला.


फ्रांस मध्ये वाहतुक आपल्या वाहतूकीच्या विरुद्ध दिशे ने होते. म्हणजे दोन दिशांना जाणार्‍या वाहनांची दिशा उलटी आहे. आणि गाड्या सुद्धा left hand drive आहेत.


दोन वाजता वाटेतच जेवणासाठी थांबलो.आपल्या हाय वे वर असतो तसाच तो एक फुड प्लाज़ा होता.फ्रांस मधे व्हेज लोकांचे हाल आहेत.सॅन्ड वीच सोडून काहीच व्हेज मिळत नाही.आणि त्यात भाषेचा प्रॉब्लेम. फ्रेंच लोकं अजिबात इंग्लीश बोलत नाहीत. इंग्लीश बोलणर्‍या लोकांना ते डिमांड देत नाहीत. ब्रेड सारखी काहीतरी कडक कडक गोष्ट पोटात घुसवली आणि गाडीत परत आलो.गाडीत मालामाल विकली सिनेमा चालू होता. पाच च्या सुमारास पॅरिस जवळ पोचलो. पॅरिस चा विमानतळ शहरापासून खूप लांब आहे.आणि पॅरिस ला जाणारा महामार्ग runway खालून जातो ! परत येताना याच ठिकाणी आम्हाला विमानदिसलं.

अत्यंत सुंदर अशा पॅरिस शहरात पोचल्या पोचल्या आयफेल टॉवर चं दर्शन घडलं. बस मधून उतरून आम्ही एका होडित बसलो. ती होडी (cruise) आम्हाला seine नदिमधुन पॅरिस दर्शन घडवणार होती! त्या होडितून फ्रांस चा सौंदर्याचा एक ओवरव्यू मिळाला. नक्षीदार पूल,भव्य इमारती आणि चर्च बघून डोळे दिपत होते. किती फोटो काढू आणि किती नको कळतं नवतं. पण एक गोष्ट खरी आहे, फोटोकाढता काढता तुम्ही डोळ्यांनी दिसणार्‍या सौंदर्याला मुकता. जशी रात्र होत होती तसं तिचं सौंदर्य अजुनाच वाढत होतं.


सातच्या सुमारास हॉटेल मध्ये पोचलो.lovotel massy palaseu हे त्या three star हॉटेल चा नाव.हॉटेल च्या रूम प्रशस्त आणि सुंदर होत्या. फ्रेश झाल्यावर हॉटेल च्या डाइनिंग हॉल मधे भारतीय जेवण वारपून जेवलो. fruit salad,पापड ,बटाटा वडा ............. नावं ऐकूनच पाणी सुटलं तोंडाला.अनेक महिने घराचं जेवण मिळालं नाही कि मग अशा जेवणावर तुटून पडायला होतं.रात्री एकाच्या लॅपटॉप मधे सगळे फोटो ट्रान्स्फर करून tv बघता बघता झोपून गेलो.

इथून आले आहेत पाहुणे